अचानक क्रिकेट सोडणारी खेळाडू बनली ‘ICC क्रिकेटर ऑफ द इयर’, मंधानालाही टाकलं मागे

Jan 26, 2023, 20:57 PM IST
1/5

ICC ने इंग्लंडची खेळाडू Nate Siever हिची 'महिला क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून निवड केलीये.

2/5

गेल्या वर्षी फलंदाजी आणि गोलंदाजीने धमाका करणाऱ्या सिव्हरला रेचल हेहो फ्लिंट ट्रॉफी देण्यात येणार आहे. 

3/5

सिव्हरसोबत या शर्यतीमध्ये आणखी तीन महिला खेळाडूंचा समावेश होता. न्यूझीलंडची अमेलिया कर, ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी आणि भारताच्या स्मृती मानधना यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं.

4/5

गेल्या वर्षी सिव्हरने 33 सामने खेळले होते. या 33 सामन्यांमध्ये तिने 22 विकेट घेतल्या आणि 1346 रन्स केले होते. यादरम्यान सिव्हरने इंग्लंडचं नेतृत्वही केलं होतं. तिने 2022 मध्ये वनडे फॉर्मेटमध्ये 60 च्या सरासरीने 833 रन्स केलेत.

5/5

नेट सिव्हर गेल्या वर्षी चर्चेत आली होती जेव्हा तिने इंग्लंडच्या T20 लीग व्हिटॅलिटी लीगच्या मध्येच मानसिक आरोग्यामुळे क्रिकेटमधून ब्रेक जाहीर केला होता. मुख्य म्हणजे तिच्या या निर्णयाचं खूप कौतुक झालं. दोन महिन्यांनी तिने पुन्हा कमबॅक केलं होतं.