Viral News : कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो रशिया मुलगा; फोटो व्हायरल

आपल्या कोकणी मित्रांबरोबर संवाद साधताना त्याला भाषेचा कोणताही अडसर जाणवत नाही. मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहायला आणि बोलायला शिकला आहे.  येथील भाषा, संस्कृती , खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला आहे.

Jan 27, 2023, 23:58 PM IST

Russian Boy Studying In Maharashtra School : मिरॉन नावाचा अकरा वर्षाचा रशियन मुलगा  कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आई-वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला होता. भारत भ्रमंती करत असताना सिंधुदुर्ग मधल्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शाळेला त्याने भेट दिली. आई वडिलांकडे त्याने याच शाळेत शिकायचे आहे असा हटट् धरला. गेले महिनाभर मिरॉन याच शाळेत शिकत आहे. शाळेतील मुलांबरोबर तो मराठीमध्ये शिक्षण घेत आहे . वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये देखील तो सहभागी होत आहे.

1/5

मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहायला आणि बोलायला शिकला आहे. 

2/5

शाळेतली प्रार्थना देखील त्याने पाठ केली आहे. शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार सुद्धा तो आवडीने खातो .

3/5

चार महिन्यानंतर त्याला रशियात परत जावे लागणार आहे परंतु पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईन अस तो म्हणतो

4/5

हा रशियन मुलगा वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो

5/5

मिरॉनने स्वतःला पाहुणा विद्यार्थी म्हणून कोणतीही विशेष वागणूक न देण्याची विनंती शिक्षकांना केली आहे. शाळेतील सर्व शिक्षक सुद्धा त्याच्या समरसतेचे कौतुक करतात आणि त्याला आवडीने शिकवतात.