White Crow : पुण्यात आढळला पांढरा कावळा

White Crow : याआधीही दोन वर्षांपूर्वी शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा लोकांच्या दृष्टीस पडला होता. पांढरा कावळा पाहिल्यानंतर नागरीकांनी याचे फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

Apr 09, 2023, 16:13 PM IST

White Crow : आजपर्यंत आपण काळ्या रंगाचा कावळा  पाहिला असेल. मात्र, आता पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये पांढरा कावळा पाहायला मिळाला आहे.  पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा पाहून पुणेकर आश्चर्यचकित झाले (White Crow). 

1/5

या पांढऱ्या कावळ्याचे फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागरिक गर्दी करतात.  

2/5

काळ्या कावळ्यांच्या थव्यामध्ये पांढरा कावळा पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. 

3/5

पांढरा कावळा हा अत्यंत दुर्मिळ आहे. 

4/5

जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची कमतरता कमी असल्याने हा प्रकार आढळतो.

5/5

तज्ज्ञांच्या माहितीनुसार अशा प्रकारचा कावळा हा दहा हजार कावळ्यांमधून एखादा सापडतो.