PHOTOS: ती सध्या काय करते? एका चुकिच्या बातमीमुळं उध्वस्त झालेलं 'या' अभिनेत्रीचं करिअर

Priya Gill: अशीच अभिनेत्री म्हणजे प्रिया गिल. या अभिनेत्रीने मोजून काही सिनेमा केले. मात्र या अभिनेत्रीने मोजकेच सिनेमा करुनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Feb 19, 2024, 18:09 PM IST

मुंबई :  अशा अनेक अभिनेत्री येतात आणि जातात मात्र अशा क्वचितच कलाकार असतात जे  प्रेक्षकांच्या मनात एका सिनेमातूनही घर करुन जातात. अशीच अभिनेत्री म्हणजे प्रिया गिल. या अभिनेत्रीने मोजून काही सिनेमा केले. मात्र या अभिनेत्रीने मोजकेच सिनेमा करुनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र तिने सिनेसृष्टीतून एक्झिट घेण्यामागचं कारण काय याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

1/7

संजय कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली

'सिर्फ तुम'मधील अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का? या अभिनेत्रीने संजय कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. या अभिनेत्रीचं नाव प्रिया गिल आहे. मात्र गेल्या १७ वर्षांपासून अभिनेत्री सिनेसृष्टीपासून गायब आहे.   

2/7

वैवाहिक जीवन आनंदात जगते

२००६ साली आलेला 'भैरवी' या सिनेमात प्रिया शेवटची दिसली होती. यानंतर ती कधीच सिल्वर स्क्रिनवर दिसली नाही. रिपोर्टनुसार, प्रिया डेनमार्कमध्ये राहते आणि तिचं वैवाहिक जीवन आनंदात घालवत आहे.   

3/7

एका रात्रीत मोठ्या पडद्यापासून गायब झाली

एका रात्रीत प्रिया मोठ्या पडद्यापासून गायब झाली. तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रिपोर्टनुसार प्रियाने सिनेसृष्टीतून एक्झिट एका फेक न्यूज रिपोर्टमुळे घेतली होती. 

4/7

वादाच्या भोवऱ्यात अडकली

एक अशी न्यूज व्हायरल झाली होती की, एका गुरुद्वारामध्ये प्रियानने गरिब मुलांना जेवण वाटलं होतं. ज्यानंतर ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. या बातमीनंतर प्रियाने मीडिया आणि सिनेसृष्टापासून लांब झाली.   

5/7

इंटीमेट सीनसाठी कम्फर्टेबल नव्हती

बऱ्याच रिपोर्टसमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, प्रिया इंटीमेट सीन करण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती. या कारणामुळे तिने सिनेसृष्टीपासून दुरावली आणि प्रोफेशनल करिअरपासून तिने ब्रेक घेतला. 

6/7

प्रिया रातोरात स्टार बनली

आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रियाला 'सिर्फ तुम'मध्ये तिच्या साधेपणाने आणि तिच्या गोड स्माईलसाठी तिला चांगलीच पसंती मिळाली होती. या सिनेमानंतर प्रिया रातोरात स्टार बनली. 

7/7

या सिनेमात दिसली

यानंतर अभिनेत्री 'श्याम घनश्याम', 'बडे दिलवाले', 'जोश' आणि 'रेड'सारख्या सिनेमात दिसली होती. २००६ साली अभिनेत्री शेवटची दिसली.