महाराष्ट्रातील Dark Forest! सूर्य प्रकाशही पोहचत नाही; पावसाळ्यात इथं फिरणं म्हणजे नुसता थरार

Aadrai Jungle : महाराष्ट्रातील हे Dark Forest नेमकं आहे कुठे? इथं जायचं कसं जाणून घेऊया. 

| Jul 28, 2024, 23:31 PM IST

Aadrai Jungle Trek Malshej Ghat region of Maharashtra : महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे जिथं फिरताना पर्यटकांना विलक्षण अनुभव येतो. यापैकीच एक आहे ते  महाराष्ट्रातील Dark Forest. अर्थात माळशेज घाटातील आडराई जंगल. आयुष्यात एकदा तरी या जंगलाची नक्की सफर करा.

1/7

 महाराष्ट्रातील हे Dark Forest! माळशेज घाटाच्या कुशीत वसलेले आहे. या जंगलात अनेक छुपे धबधबे देखील आहेत. 

2/7

आडराई जंगलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथील वनसंपत्ती. या जगंलात विविध प्रकारची औषधी वनस्पती आहेत. 

3/7

पुण्यातून येत असेल तर जुन्नर मार्गच आणि माळशेज घाटाच्या अगोदरच असलेलं खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून ट्रेक सुरू करावा. 

4/7

मुंबईवरून स्वतःच्या वाहनाने येयायच झाल्यास माळशेज घाट ओलांडून खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून ट्रेक सुरू करावा. 

5/7

मुबई वरून कल्याणमार्गे नगरला जाणाऱ्या बस ने खुबी फाट्यावर उतरावे.  खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून हा ट्रेक सुरू होतो.    

6/7

जबरदस्त आणि वेगळा अनुभव हवा असेल तर आडराई जंगल ट्रेक नक्की करावा. याच जंगलात महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा काळू धबधबा देखील आहे.   

7/7

आडराई या नावाने हे घनदाट जंगल ओळखले जाते. या जंगलात सूर्यप्रकाशही फारसा पोहचत नाही.