तब्बल 3 दिवस सुरु होतं आमीर-करिश्माच्या 'त्या' किसिंग सीनचं शुटिंग; अजब होतं कारण, दिग्दर्शकानेच केला खुलासा

Raja Hindusatani Movie Facts: करिश्मा कपूरच्या आधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यातील कोणत्याच मुलीने बॉलिवूड चित्रपटात काम केलं नव्हतं. त्यातच पडद्यावर तिने किसिंग सीन देणं हे कुटुंबासाठी फार गंभीर प्रकरण होतं. पण यामागील किस्सा रंजक आहे.   

| Nov 12, 2024, 12:02 PM IST
1/9

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या 'राजा हिदुस्तानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं होतं. हा चित्रपट अनेक कारणांमुळे गाजला होता. चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती, जी आजही तितकीच प्रसिद्द आहेत. 1996 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वात मोठा हिट आणि ब्लॉकबस्टर होता. समीक्षकांनीही चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं.   

2/9

राजा हिंदुस्तानी चित्रपट अनेक कारणांमुळे आयकॉनिक ठरला होता. चित्रपट रिलीज होण्याआधी आमीर खान आणि करिश्मा कपूरच्या किसिंग सीनवरुन तर तुफान चर्चा रंगली होती, ज्याचा चित्रपटाला भरपूर फायदा झाला. चित्रपटांमध्ये किसिंग सीन दाखवणं तेव्हा काही नवीन बाब नव्हती. मात्र या चित्रपटातील किसिंग सीनने एक वेगळीच उंची गाठली होती.   

3/9

करिश्मा कपूरच्या आधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यातील कोणत्याच मुलीने बॉलिवूड चित्रपटात काम केलं नव्हतं. त्यातच पडद्यावर तिने किसिंग सीन देणं हे कुटुंबासाठी फार गंभीर प्रकरण होतं. आपला पहिला किसिंग सीन देणाऱ्या करिश्मा कपूरला या चित्रपटासाठी फिल्मफेअरसचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. पण तुम्हाला माहिती आहे का आमीर खान आणि करिश्मामधील किसिंग सीन शूट होण्यासाठी 3 दिवस लागले होते.   

4/9

धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. नुकतंच लहरें रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "करिश्मा सेटवर फार चांगली होती. ती फार उत्सुक होती. तिला पाहूनच हे लक्षात येत होतं. तिने याआधी कधीच किसिंग सीन दिला नव्हता. मी तिला कोणते कपडे घालायचे आहेत सांगितलं. तसंच बॅकग्राऊंड फार सेक्सी नसेल अशी माहिती दिली. त्यावर तिने तुम्ही मला हे सर्व सांगण्याची गरज नाही असं सांगितलं होतं".  

5/9

धर्मेंश यांनी आपण करिश्मासह सेटवर आलेल्या तिची आई बबिता यांनाही सगळा सीन समजावून सांगित्याची माहिती दिली.   

6/9

असं करण्यामागील कारणाचा उलगडा करताना ते म्हणाले, "करिश्मा त्यावेळी फार तरुण होती आणि आपल्यावर आईचा प्रभाव असतोच. करिश्माची प्रतिमा फार चांगली होती आणि ती नेहमी चर्चेत असणारी मुलगी नव्हती. बबिताजी तीन दिवस शुटिंगमध्ये बसल्या होत्या आणि मीदेखील त्यांना परत पाठवलं नाही".  

7/9

किसिंग सीन असला तरी आपण त्याचा चित्रपट विकण्यासाठी वापर करायचा नाही याची आपण काळजी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. चित्रपट निर्मात्यांना आपण किसिंग सीन पोस्टमध्ये वापरावा असं वाटत होतं, पण आपण त्यासाटी परवानगी दिली नाही असं त्यांनी सांगितलं.   

8/9

करिश्माच्या आधी ऐश्वर्या रायला 'राजा हिंदुस्तानी' ऑफर करण्यात आला होती, जी तोपर्यंत मिस वर्ल्ड बनली नव्हती. 2012 मध्ये वोगला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं होतं की, मिस इंडिया होण्यापूर्वीच तिला चित्रपटाच्या ऑफर होत्या. ती म्हणाली होती, 'मी मिस वर्ल्डसाठी गेले नसते तर 'राजा हिंदुस्तानी' हा माझा पहिला चित्रपट ठरला असता".  

9/9

कास्टिंगच्या वेळी, हा चित्रपट जुही चावलाला देखील ऑफर करण्यात आला होता. पण तिने नकार दिला. अखेर 'राजा हिंदुस्तानी' करिश्माच्या झोळीत पडला आणि तिला करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट मिळाला. इतकंच नाही तर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.