लग्नानंतर पुढच्याच क्षणी आयरा नुपूरला म्हणाली Goodbye; काय होती कुटुंबीयांची रिअॅक्शन? पाहा नवे Photos

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding: आता तुम्ही म्हणाल ही कोणती नवी भूमिका? आणि त्याबद्दल माध्यमांनी माहिती दिलीच कशी नाही....? 

Jan 05, 2024, 09:32 AM IST

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट, अभिनेता आमिर खान सध्या एका कमाल भूमिकेत आहे. त्याची ही भूमिका त्याला भलतीच आवडलिये हेसुद्धा लगेचच लक्षात येत आहे. 

1/10

आमिरच्या लेकीचं लग्न

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding : आमिरला ही भलतीच आवडलेली भूमिका आहे, सासरेबुवांची. आमिर खानची मुलगी आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली.   

2/10

साधासुधा लूक

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबतच्या रिलेशनशिपला आयरा आणि नुपूर या दोघांनीही एक नवं नाव आणि एक नवी ओळख देत सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली.   

3/10

जॉगिंग करत आला नवरदेव

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

हा विवाहसोहळा खऱ्या अर्थानं खास केला तो म्हणजे नुपूर शिखरेनं. कारण, तो विवाहस्थळी चक्क जॉगिंग करत पोहोचला होता. नेहमीचा झगमगाट आणि महागडे कपडे या सर्व गोष्टींना शह देत आमिरचा जावई नुपूर आणि त्याची लेक आयरा बऱ्याच Comfertable Look मध्ये या खास क्षणी सर्वांसमोर आले. 

4/10

नुपूर विवाहस्थळी आला आणि ...

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

घामाघूम झालेल्या रुपातच नुपूर विवाहस्थळी आला आणि तिथं त्यानं आयराला आपण आपली पत्नी म्हणून स्वीकारत असल्याचं शपथ घेतली. 

5/10

कोर्ट मॅरेज

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

कोर्ट मॅरेज पद्धतीनं लग्न पार पडल्यानंतर आयरा आणि नुपूरला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या आणि या शुभेच्छांचा स्वीकार करताच आयरानं माईक हाती घेऊन 'आता नुपूर अंघोळ करायचा जाईल... Goodbye' हे जाहीर केलं आणि तिथं आलेल्या पाहुण्यांमध्ये एकच हशा पिकला.   

6/10

मित्रपरिवाराची हजेरी

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

आयरा आणि नुपूरच्या लग्नसोहळ्यासाठी त्यांच्या खास मित्रपरिवारानं हजेरी लावली होती. तर, आमिरची मित्रमंडळीसुद्धा या लग्नसोहळ्याला हजर होती.   

7/10

एकच कल्ला

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

etherealstudio.in च्या इन्स्टा पेजवरून आयरा आणि नुपूरच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले. जिथं या लग्नसोहळ्यामध्ये गाणी, डान्स परफॉर्मन्स आणि एकच कल्ला झाला असल्याचं पाहायला मिळालं. 

8/10

लग्नसोहळ्याचे फोटो

9/10

नुपूर आणि आयराचे गोड रुसवेफुगवे

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

यावेळी नुपूर आणि आयराचे गोड रुसवेफुगवे आणि त्यावर कुटुंबीयांच्या प्रतिक्रियाही पाहण्याजोग्या होत्या. 

10/10

नुपूर आणि आयरा

Aamir Khan Daughter ira khan Nupur Shikhare wedding latest photos

(सर्व फोटो छाया सौजन्य- etherealstudio.in/ इन्स्टाग्राम )