शिवीगाळ केल्यामुळे किती शिक्षा होऊ शकते? जाणून घ्या...

आजकाल शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार रोजच पहायला मिळतात. व्यावसायिक किंवा कौटुंबिक व्यवहार, घरगुती भांडण, शुल्लक वाद अशी कित्येक कारणं आहेत ज्यामुळे लोक एकमेकांना शिव्या देतात किंवा जीवे मारण्याच्या धमक्या देतात. पण यामुळे तुमच्या कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

Apr 22, 2023, 18:15 PM IST
1/6

Abusing language

आजूबाजूला राहणारे किंवा रस्त्यावरुन चालणारे लोकसुद्धा भांडण झाले की एकमेकांना अश्‍लील शिव्या देतात. कधी कधी जीवे मारण्याची धमकीही देतात. पण लोकांना वाटतं त्याने काही होणार नाही. पण असे केल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

2/6

FIR

जीवे मारण्याची धमकी देणे आणि अश्‍लील शिवीगाळ करणे हे दोन्हीही भारतीय कायद्यात दंडनीय गुन्हे आहेत. अशा गुन्ह्यांवर, सीआरपीसीच्या कलम 154 अंतर्गत थेट पोलिस स्टेशनमधून एफआयआर नोंदविला जातो

3/6

obscene language

एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम 294 नुसार दंडनीय गुन्हा आहे. या कलमात दोन्ही पक्ष तडजोडही करू शकत नाहीत. कारण गैरवर्तन केल्याने केवळ पीडित पक्षाचेच नाही तर संपूर्ण समाजाचे नुकसान होते. त्यामुळे या प्रकरणात जामीनही देता येत नाही.

4/6

jail1

या कलमांतर्गत आरोपीला 3 महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. मात्र या गुन्ह्यात सामान्यतः आरोपींना कोणत्याही प्रकारची तुरुंगवासाची शिक्षा दिली जात नाही तर दंड भरावा लागतो. परंतु हा खटला अनेक वर्षे चालतो आणि तेवढीच वर्षे आरोपींना न्यायालयात हजेरीसाठी जावे लागते.

5/6

Death threats

दुसरीकडे किरकोळ वादातून जीवे मारण्याची धमकी देणे सामान्य झाले आहे. मी तुला कापून टाकीन किंवा तुला संपवीन असे शब्द बोलणे म्हणजे जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे आहे. (फोटो - reuters)

6/6

jail

भारतीय दंड संहितेचे कलम 506 जीवे मारण्याची धमकी देण्याशी संबंधित आहे. जीवे मारण्याची धमकी देणे हा साधा गुन्हा मानला जातो पण तो साधा गुन्हा नाही. जर एखाद्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेली असेल तर त्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.