5 पदार्थ घ्या आणि Acidity पासून आराम मिळवा, गोळ्यांना करा बायबाय

तुम्हाला होतोय का अपचनाचा त्रास? रोज आहारात या पदार्थांचा समावेश करा. 

Feb 24, 2021, 11:03 AM IST
1/6

अॅसिडिटीची कटकट हे पदार्थ घालवणार

अॅसिडिटीची कटकट हे पदार्थ घालवणार

अपचनाची समस्या तर अनेकवेळा उद्भवत असते. कधी अति खाण्यानं तर कधी न खाल्ल्यानं तर कधी अरबट-चरबट खाऊन होणाऱ्या पित्तानं अपचन होतं. प्रत्येकवेळी गोळी घेऊन अपचनाची समस्या दूर कऱण्यापेक्षा आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश केला तर आपल्याला अपचनाची समस्या दूर करायला मदत होणार आहे. असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे अपचन होणार नाही किंवा ती समस्या दूर होईल जाणून घ्या.  

2/6

एक केळं खा आणि अॅसिडिटीची समस्या घालवा

एक केळं खा आणि अॅसिडिटीची समस्या घालवा

रोज एक केळ खाल्ल तर पोटातील पित्त कमी होण्यास मदत होते. केळं आतड्यांमध्ये जाऊन आपल काम करतं ज्यामुळे पित्ताची समस्या नाहीशी होते. केळ्याचा गुणधर्म थंड आहे. याशिवाय केळ्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. दररोज केळ खाल्ल तर अपचन, जळजळ आणि पोट साफ होण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

3/6

पोटाला थंड ठेवण्यासाठी प्या ताक

पोटाला थंड ठेवण्यासाठी प्या ताक

मसालेदार किंवा जास्त जेवल्यानं देखील काहीवेळा अपचनाचा त्रास उद्भवतो. अशावेळी एक ग्लास ताक यावर सर्वोत्तम उपाय आहे. ताकाचा गुणधर्म थंड असतो. त्यामध्ये लॅक्टीक अॅसिड असतंय जे पोटातील पित्ताला शमवतं. त्यामुळे अपचनाचा त्रास होणार नाही. पोटात जळजळस, करपट ढेकर आणि अपचनासारखा समस्यांवर ताक हा घरगुती आणि उत्तम पर्याय आहे. ताक नको असल्यास दही हा देखील उत्तम पर्याय आहे. 

4/6

थंड दुधामुळे अपचनाचा त्रासापासून सुटका

थंड दुधामुळे अपचनाचा त्रासापासून सुटका

अपचनाच्या समस्येवर थंड दूध पिणं देखील फायदेशीर आहे. थंड दूध ताकाप्रमाणेच पोटात आपलं काम करतं. दुधात कॅल्शियम असतं. पोट, छातीत जळजळ किंवा आम्लतेची इतर लक्षणे जणवत असतील तर औषधाऐवजी एक ग्लास थंड दूध घेतल्यास आराम मिळू शकतो. 

5/6

ओट्स

ओट्स

ओट्समध्ये हाय फायबर असतात. त्यामुळे अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर करतं. त्यामुळे ओट्सचा आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे. 

6/6

हिरव्या भाज्या खा ताज्या ताज्या

हिरव्या भाज्या खा ताज्या ताज्या

पालक, ब्रोकली, कोबी यासारख्या अनेक हिरव्या भाज्या पित्त असणाऱ्यांनी खायला हव्यात. या भाज्यांमध्ये अल्काइन घटक असतो जो आपल्या पोटातील पचनाला नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. या भाज्यांमध्ये शर्करेचं प्रमाण देखील कमी असल्यामुळे पित्त होण्याचा धोका कमी होतो.