'मी मेलो नाही', फ्लॉप चित्रपटांवर अक्षय कुमार असं का म्हणाला?

अभिनेत्याचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. फ्लॉप चित्रपटांमागील कारण काय असा प्रश्न त्याला विचारला जात आहे. त्यावर अक्षयने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

| Aug 02, 2024, 16:04 PM IST
1/7

'सरफिरा'

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला. 

2/7

वर्षात 4-5 चित्रपट

आता पुन्हा एकदा अक्षय कुमार 'खेल खेल में' हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. अक्षय एका वर्षात 4-5 चित्रपट करतो. 

3/7

'खेल खेल में'चा ट्रेलर लॉन्च

'खेल खेल में'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात अक्षयने फ्लॉप चित्रपटावर मत व्यक्त केलं आहे. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. 

4/7

काळजी करु नका

मला तितकं काही वाटत नाही.  5 चित्रपट चालले नाहीत. पण काळजी करु नका. सर्व काही ठीक होईल. असे मला मेसेज येतात. 

5/7

मी मेलेलो नाही

मला त्यांना विचारायचे आहे की, हे काय आहे. मी मेलेलो नाही. शोक संदेश येतात. अरे यार, एका पत्रकाराने लिहिले-'काळजी करु नका, तुम्ही परत याल'

6/7

मी कुठे गेलो आहे?

त्यावर अक्षय म्हणाला की, भाऊ, तू हे का लिहित आहेस? मी कुठे गेलो आहे? मी इथे आहे, मी नेहमी काम करत राहीन. लोक काहीही म्हणले तरी हरकत नाही. 

7/7

मी स्वत: कमावतो

मी जे काही कमावतो ते मी स्वत: कमावतो. मी कधी कोणाकडे काही मागितलं नाही. मी मरेपर्यंत काम करत राहीन. जोपर्यंत कोणी मला गोळ्या घालत नाही. असं अक्षयने म्हटलं आहे.