PHOTO: कोण आहे 'हा' अभिनेता? मामामुळे मिळाला पहिला चित्रपट, बॉक्स ऑफिसवर केलं राज्य,

Bollywood Actor Govinda: गोविंदाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याला पहिला चित्रपट हा त्याच्या मामामुळे मिळाला.  मात्र, हे फार कमी लोकांना माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा जरी आज फिल्मी दुनियेपासून दूर असला तरी एक काळ असा होता की त्याच्याकडे चित्रपट साईन करण्यासाठी देखील वेळ नव्हता. 

| Jan 02, 2025, 12:04 PM IST
1/7

गोविंदा

बॉलिवूड अभिनेता गोविंदा जरी आज फिल्मी दुनियेपासून दूर असला तरी एक काळ असा होता की त्याच्याकडे चित्रपट साईन करण्यासाठी देखील वेळ नव्हता. 

2/7

इंडस्ट्रीवर राज्य

त्याने अनेक वर्षे इंडस्ट्रीवर राज्य केलं. राजेश खन्ना नंतर गोविंदा हा दुसरा स्टार बनला. मात्र, आता गोविंदाचा मुलगा अभिनयाच्या जगात प्रवेश करणार आहे. 

3/7

हिट चित्रपट

गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचे अनेक चित्रपट हिट ठरले. त्यासोबतच स्वत: च्या अटींवर काम करणाऱ्या गोविंदाने त्याचे प्रत्येक पात्र सिद्ध आणि हिट करून दाखवले. 

4/7

करिअर

सध्या अनेक कलाकार हे त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर आहेत. ते खूप काळजीपूर्वक चित्रपट निवडतात. परंतु, गोविंदाने त्याच्या करिअरचा कधी विचार केला नाही. तो एकेकाळी अनेक चित्रपटांची शूटिंग करत होता. 

5/7

संघर्ष

गोविंदाने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत 125 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अभिनेत्याला खूप संघर्ष करावा लागला. 

6/7

पहिला चित्रपट

गोविंदाने त्याच्या यशाचे सर्वात मोठे श्रेय हे नेहमीच त्याच्या आईला दिले. 1986 मध्ये 'तन बदन' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट त्याला त्याच्या मामामुळे मिळाला होता.   

7/7

यशवर्धन आहुजा

1999 मध्ये बीबीसीने जगातील टॉप 10 कलाकारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये गोविंदा 10 क्रमांकावर होता. आता तो अभिनयापासून दूर आहे. त्याचा मुलगा दिग्दर्शक सई राजेश यांच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.