भूमिकेच्या मोबदल्यात S*x ची मागणी! अभिनेत्रीचे धक्कादायक Whatsapp Chat व्हायरल; 'एका रात्रीसाठी..'

Actress Shocking Whatsapp Chat Screenshots: या अभिनेत्रीकडे करण्यात आलेल्या धक्कादायक मागण्यांचा पुरावा म्हणून सोशल मीडियावरुन थेट या दोघांमध्ये काय संवाद झाला याच्या चॅटचे स्क्रीन शॉट्स शेअर करण्यात आले आहेत. या स्क्रीन शॉट्समध्ये नेमकं काय आहे? कोणी आणि कोणाकडे ही मागणी केली? जाणून घ्या सविस्तर... 

| Aug 19, 2024, 16:44 PM IST
1/10

Casting Couch whatsapp chat

बॉलिवूड असो किंवा हिंदी मालिका सृष्टी असो काम देण्याच्या मोबदल्यात स्ट्रगलिंग कलाकारांकडून वाटेल त्या गोष्टींची त्यातही खास करुन शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार काही नवा नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका अभिनेत्यानेच याबद्दल भाष्य केलं आहे.  

2/10

Casting Couch whatsapp chat

'पंड्या स्टोअर'च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता मोहित परमार असं कास्टिंग काऊचविरुद्ध मोर्चा उघडणाऱ्या तरुण अभिनेत्याचं नाव आहे. मोहितच्या ओळखीतील मैत्रिणीला रोलसाठी कॉम्प्रमाइज करण्यास सांगण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.   

3/10

Casting Couch whatsapp chat

मोहितने केवळ आरोप केलेत असं नाही तर त्याने व्हॉट्सअपवर या कॉम्प्रमाइजसाठी विचारणाऱ्या व्यक्तीने नेमके काय अश्लील मेसेज केले याचे स्क्रीन शॉटही शेअर केले आहेत. अभिनेत्री प्रेरणा ठाकूरला हे मेसेज व्हॉट्सअपवर पाठवण्यात आल्याचं मोहितने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

4/10

Casting Couch whatsapp chat

या व्हॉट्सअप चॅटमध्ये समोरची व्यक्ती कास्टिंग डायरेक्टर असल्याचं सांगते. स्कायलाइन स्प्री प्रोडक्शन कंपनीमध्ये आपण काम करतो असं सांगत त्याने संवाद साधण्यास सुरुवात केली. तुला मनासारखी भूमिका हवी असेल तर तडजोड करायला तयार राहा असं तो तिला या चॅटमध्ये सांगताना दिसतोय.

5/10

Casting Couch whatsapp chat

याच चॅटमध्ये कॉम्प्रमाइज करायला सांगणारी हा व्यक्ती अभिनेत्री प्रेरणाला थेट मी तुझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवणार आहे असं घाणेरड्या शब्दांचा वापर करत सांगताना संवादामधून स्पष्ट होत आहे.  

6/10

Casting Couch whatsapp chat

"अशा लोकांपासून सावध राहा. हा कास्टिंग कॉर्डिनेटअर असल्याचं सांगून महिला कलाकारांबरोबर गैरवर्तवणूक करत आहे. त्यांचं तो लैंगिक शोषण करतो. हा तिला (प्रेरणाला) एका रात्रीसाठी बोलत आहे," असं मोहिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मैत्रीणीबरोबर घडलेला प्रकार सांगताना म्हटलं आहे.  

7/10

Casting Couch whatsapp chat

मोहितने या व्यक्तीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. "या व्यक्तीने तुम्हाला काम देतो म्हणून संपर्क केला अथवा तो एखाद्या ग्रुपमध्ये दिलसा तर त्याला ब्लॉक करा. रिपोर्ट करा अथवा थेट तक्रार करा. त्याचं नाव प्रेम मल्होत्रा आहे," असं मोहितने इन्स्टास्टोरीमध्ये व्हॉट्सअप कॉनटॅक्टचा स्क्रीन शॉट शेअर करत म्हटलं आहे.

8/10

Casting Couch whatsapp chat

प्रेरणाने व्हेरी पारिवारीक (2024) आणि खट्टा मिठा (2021) बरोबरच मोहितने काम केलेल्या 'पंड्या स्टोअर'मधूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. प्रेरणाच्या पाठिशी आता तिचा मित्र मोहीत उभा राहिला असून त्याने इतरांनाही यासंदर्भात इशारा दिला आहे.

9/10

Casting Couch whatsapp chat

आश्चर्याची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे केवळ अभिनेत्रींनाच नाही तर यापूर्वी अनेकदा बड्या कलाकारांनाही अशाप्रकारचे कास्टींग काऊचचे अनुभव आले आहेत. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये आयुषमान खुरानानेही त्याच्याकडे एका निर्मात्याने लैंगिक सुखाची मागणी केल्याचा दावा केलेला.

10/10

Casting Couch whatsapp chat

सध्या प्रेरणा ठाकूर प्रकरणामुळे केवळ चित्रपटच नाही तर छोट्या पडद्यावरील भूमिकांसाठीही मोठ्या प्रमाणात कास्टींग काऊचचे प्रकार घडतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.  (सर्व फोटो -सोशल मीडियावरुन साभार)