रक्षाबंधनाच्या दिवशी घरी बाळाचा जन्म झालाय; गोड नाव देऊन आनंद करा द्विगुणित

रक्षाबंधन हा सण कुटुंबासाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो. कारण या सणाच्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येतो. अशावेळी जर याच दिवशी तुमच्या घरी गोंडस बाळाचा जन्म झाला असेल तर त्यांच्या नावांचा विचार करताय. अशावेळी मुलांना द्या अर्थपूर्ण नावे. 

| Aug 19, 2024, 16:11 PM IST

रक्षाबंधन हा सण सोमवारी 19 ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जाणार आहे. कुटुंबासोबत आनंदाने, उत्सवाने साजरा केला जाणारा हा सण. घरी एका चिमुकल्याचा जन्म हा देखील असाच कुटुंबाने साजरा केला जाणारा असा एक क्षण आहे. असं असताना जर रक्षाबंधनाच्या दिवशी घरी बाळाचा जन्म झाला तर यासारखा दुग्धशर्करा योग नाही. त्यामुळे मुला-मुलींसाठी अतिशय खास नावे आणि त्याचे अर्थ. 

1/6

रक्षिता -राखीच्या दिवशी जन्मलेल्या मुलीसाठी - रक्षा करणारी  रक्षा -हिंदू नाव. सुरक्षा राखी -मुलीचे ट्रेंडिग नाव, रक्षा करणारी, सुरक्षेचे प्रतिकर 

2/6

सेल्वी - सेल्वी हे नाव युनिक असे आहे. धनाचे प्रतिक, राजसी, सुख - समृद्ध असा या नावाचा अर्थ आहे.  कशिश - कशिश हे नाव देखील युनिक आहे. शिव, आकर्षक असा त्याचा अर्थ आहे.  धनवी  - धनी असा अर्थ धनवी या नावाचा आहे. 

3/6

अरिका - मुलींसाठी अरिका हे नाव अतिशय गोड आहे.  सुंदर, धनी आणि समृद्ध असा या नावाचा अर्थ आहे. रक्षित - रक्षित हे नाव मुलासाठी अतिशय योग्य आहे. रक्षण करणारा भाऊ असा त्याचा अर्थ होतो. सुरक्षित असा या नावाचा अर्थ आहे. रक्ष - रक्षा करणारा असा या दोन अक्षरी नावाचा अर्थ आहे.   

4/6

उत्सव - उत्सव हे नाव अतिशय युनिक आहे. सण, उत्सव असा या नावाचा अर्थ आहे.  बंधन - बंधन हे नाव प्रेमाचे बंधन असे समजले जाते.  उल्लास - उत्सव, प्रकाश असा अर्थ या नावाचा आहे. म्हणून मुलाला उल्लास हे नाव ठेवू शकता. 

5/6

रचेत - रचेत हे नाव अतिशय युनिक आहे. या नावाचा अर्थ आहे समजुतदार  मृगुल - मृगुल हे नाव अतिशय युनिक आहे. उपहार असा या नावाचा अर्थ आहे.   भाविन - भाविन हे नाव मुलांसाठी अतिशय युनिक आहे. या नावाचा अर्थ आहे आशिर्वाद 

6/6

न्यवान - न्यवान हे नाव अतिशय युनिक आणि खास आहे. पवित्र असा या नावाचा अर्थ आहे.   निशोक - आनंद, खुश असा निशोक या नावाचा अर्थ आहे. रक्षाबंधन हा सण आनंदाचा आणि ऐश्वर्याचा आहे.  आश्रित - धनाचा देव असा आश्रित या नावाचा अर्थ आहे.