अभिनेता संग्राम समेळ दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

Dakshata Thasale | Mar 10, 2021, 11:30 AM IST

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईचं सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊननंतर सुद्धा अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत (Marathi actor wedding) अडकले. यामध्ये आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. तो अभिनेता म्हणजे संग्राम समेळ (Marathi actor sangram samel marriage). संग्राम नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्याबेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1/8

संग्राम समेळनं श्रद्धा फाटक (Sangram samel wife) हिच्याशी लग्नं केलं आहे. संग्रामचा हा दुसरा विवाह सोहळा आहे. 

2/8

श्रद्धा (Shraddha Phatak) ही एक डान्सर आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा आज इचलकरंजी याठिकाणी पार पडला.  

3/8

संग्रामचं हे दुसरं लग्न आहे, याआधी संग्रामने 2016 मध्ये 'रुंजी' फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलशी विवाह केला होता. रुंजी या मालिकेतून पल्लवी खूपच प्रसिद्ध झाली होती.

4/8

 पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाली आणि मग या दोघांनी लग्नं केलं होतं. मात्र हे नात फार काळ टिकलं नाही.      

5/8

संग्राम हा मुळचा ठाण्याचा आहे त्यानं कॉमर्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. संग्रामला अभिनयाचा वारसा घरातूनचं मिळालाय असं म्हणावं लागेल. उत्तम लेखक, अभिनेता अशोक समेळ यांचा तो मुलगा आहे. संग्रामने नाटक, सिनेमा,मराठी मालिका यांमधून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.    

6/8

'पुढचं पाऊल' या मालिकेतील 'समीर' या व्यक्तीरेखेतून तो महाराष्ट्रात घराघरात पोहचला. संग्रामने ललित 205, हे मन बावरे, या मालिकांमधून तर विकी वेलिंगकर, स्वीटी सातारकर, ब्रेव हार्ट या सिनेमांतत काम केलं आहे.

7/8

 त्याचबरोबर 'एकच प्याला' या नाटकामध्येही काम केलं आहे.संग्रामच्या व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोंनंतर सर्वच माध्यमातून या नव्या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

8/8

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x