कोरोना: मदतीसाठी पुढे आले हे अभिनेते, देशासाठी करोडोंची मदत

बॉलिवूडचे अनेक अभिनेते प्रत्येक वेळी अडचणीच्या काळात देशासाठी हातभार लावत असतात.

| Mar 27, 2020, 19:06 PM IST

कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरत चालला आहे. त्यामुळे याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेवर ही होता आहे. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि उपचारासाठी करोडो रुपये खर्च होणार आहेत. याचा ताण देशाच्या तिजोरीवर पडला आहे. यातच आता मदतीसाठी अनेक स्टार्स पुढे येत आहेत. बॉलिवूडचे अनेक अभिनेते प्रत्येक वेळी अडचणीच्या काळात देशासाठी हातभार लावत असतात.

1/8

करण जौहर

करण जौहर

फिल्ममेकर करण जौहरने एका संस्थेशी मिळून मदत करण्याचा निर्णय़ घेतला आहे. इंडियन फिल्म अँड टेलिविजन इंडस्ट्रीने रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मदत करण्याचं ठरवलं आहे. करण जौहर यासोबत जोडला गेला आहे.

2/8

हृतिक रोशन

हृतिक रोशन

बॉलिवुड स्टार हृतिक रोशनने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. तो N95 आणि FFP3 मास्क वाटणार आहे. यावेळी बीएमसीचे लोकं खूप काम करत आहेत. त्यासाठी हे मास्क त्यांचं संरक्षण करेल.

3/8

कपिल शर्मा

कपिल शर्मा

कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने देखील कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ५० लाख रुपये दिले आहेत. 

4/8

प्रभास

प्रभास

बाहुबली फेम प्रभास याने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली तर आहेत. पण समाजकार्य करुन ही तो अनेकांची मनं जिंकत असतो. त्याने देशासाठी १ कोटींची मदत केली आहे. 

5/8

महेश बाबू

महेश बाबू

महेश बाबू यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी तब्बल एक कोटींची मदत जाहीर केली आहे. 

6/8

कमल हसन

कमल हसन

अभिनेता आणि नेता कमल हसन यांनी पैशांची मदत केली नसली तरी त्यांनी त्यांचं घराचं रुग्णालय म्हणून वापरावं असं आवाहन सरकारला केलं आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्यांचं घर वापरण्याचं आवाहन त्याने केलं आहे.

7/8

राम चरण

राम चरण

साऊथचा आणखी एक सुररस्टार राम चरणने पवन कल्याणडून प्रेरणा घेतली असल्याचं ट्विट केलं आहे. त्याने ७० लाखांची मदत केली आहे.    

8/8

पवन कल्याण

पवन कल्याण

साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणने मोठी मदत केली आहे. त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये १ कोटींची तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी ५०-५० लाखांची मदत केली आहे. म्हणजेच त्याने २ कोटींची भरघोष मदत केली आहे.