PHOTO: स्माईल क्वीन, आर्या आंबेकरचं अप्रतिम सौंदर्य पाहून चाहते थक्क!

मराठी अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरने शेअर केले निळ्या ड्रेसमधील फोटो. सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष. पाहा फोटो

| Aug 29, 2024, 15:41 PM IST
1/6

लोकप्रियता

अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरला झी मराठीवरील 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'मधून खूप लोकप्रियता मिळाली आहे. 

2/6

चित्रपटात काम

गायिका आर्या आंबेकरने 'ती सध्या काय करते' या चित्रपटात अभिनय केला आहे. तिचा अभिनय चाहत्यांना देखील खूप आवडला होता. 

3/6

नेहमी चर्चेत

गायनासोबतच अभिनेत्री आर्या आंबेकर ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.  नेहमी वेगवेगळ्या लुकने चाहत्यांमध्ये चर्चेत असते. 

4/6

फोटो शेअर

आर्याने नुकतेच हटके फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 

5/6

निळ्या रंगाचा ड्रेस

आर्या आंबेकरने निळ्या रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग छत्री घेतली आहे. अभिनेत्रीची क्यूट स्माईल पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. 

6/6

लाईक्सचा वर्षाव

आर्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर आर्याचे लाखो चाहते आहेत.