'या' दिवशी दीपिका होणार आई, डिलिव्हरी डेट आली समोर; इतक्या महिन्यांसाठी घेणार ब्रेक

6 वर्षानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह होणार आई-बाबा. या दिवशी दीपिका देणार तिच्या मुलाला जन्म. डिलिव्हरी डेट आली समोर. 

| Aug 31, 2024, 15:53 PM IST
1/6

बाळाच्या जन्मासाठी उत्सुक

लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. दीपिका आणि रणवीर देखील त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी खूप उत्सुक आहे. 

2/6

आई-बाबा

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. 6 वर्षानंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. 

3/6

28 सप्टेंबरला डिलिव्हरी

प्रेग्नेंसीच्या घोषणेसोबतच दीपिकाने सांगितले होते की तिची डिलिव्हरी सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यानुसार 28 सप्टेंबरला डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे.

4/6

मुंबईत होणार डिलिव्हरी

याआधी दीपिका आणि रणवीरच्या मुलाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता दीपिका मुंबईतील रुग्णालयात मुलाला जन्म देणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

5/6

ब्रेक टाईम एन्जॉय

आई होण्यापूर्वी दीपिका तिचा ब्रेक टाईम एन्जॉय करत आहे. डिलिव्हरीनंतर देखील ती पाच महिने बाळासोबत राहणार आहे. 

6/6

आगामी प्रकल्प

डिलिव्हरीनंतर दीपिका ही मार्च महिन्यानंतर तिच्या आगामी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणार आहे.