पुरुषांचं नाव घेताच सेलिब्रिटीचा उडतो थरकाप; आता मुलांच्या जन्मासाठी शोधतेय स्पर्म डोनर

लोकप्रिय सेलिब्रिटी आणि त्यांचं आयुष्य हे कायमच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतं. 

Dec 03, 2022, 14:33 PM IST

Lala Kent plans sperm donor baby: लोकप्रिय सेलिब्रिटी आणि त्यांचं आयुष्य हे कायमच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतं. 

1/6

actress influencer Lala Kent plans sperm donor baby

Lala Kent plans sperm donor baby: लोकप्रिय सेलिब्रिटी आणि त्यांचं आयुष्य हे कायमच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतं. सध्याही अशीच एक सेलिब्रिटी आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. 

2/6

actress influencer Lala Kent plans sperm donor baby

ही सेलिब्रिटी म्हणजे  लेले केंट (Lele Kent). स्पर्म डोनरच्या (sperm donor) मदतीनं आपण मुलांना जन्म देणार असल्याचं लेलेनं जाहीरच केलं आहे. होणाऱ्या पतीसोबतचं नातं तुटल्यानंतर तिनं केलेल्या या वक्तव्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. एका पॉडकास्ट मुलाखतीत तिनं यासंबंधीचं वक्तव्य केलं. इन विट्रो फर्टिलाइजेशन (IVF) ऐवजी आपण अंतर्गर्भाशयी गर्भाधान (IUI) चा पर्याय निवडून पुढच्या वर्षी एका मुलाला जन्म देऊ शकतो असं ती म्हणाली. 

3/6

actress influencer Lala Kent plans sperm donor baby

या 32 वर्षीय सेलिब्रिटीला याआधीच एक बाळही आहे. तिनं कधीच होणाऱ्या पतीसोबतचं आपलं फॅमिली प्लॅनिंग कुणापासून लपवलं नाही. पण, आता मात्र नात्यात असणाऱ्या कोणा पुरुषापासून नाही स्पर्म डोनरच्या मदतीनं बाळाला जन्म देण्याच्या निर्णयावर ती पसरली आहे.   

4/6

actress influencer Lala Kent plans sperm donor baby

एका मुलीची आई असणाऱ्या लेलेनं येत्या वर्षात बाळाला जन्म देण्याचा अंतिम निर्णय घेतला असून, त्यासाठी ती स्पर्म डोनर शोधताना दिसत आहे. होणाऱ्या पतीनं दगा दिल्यामुळं आता मी कोणत्याची पुरुषाच्या बाबतीत धोका पत्करु इच्छित नाही, असंही तिनं स्पष्ट केलं. होणाऱ्या बाळाला आपण अमर्याद प्रेम देऊ असंही ती म्हणाली.   

5/6

actress influencer Lala Kent plans sperm donor baby

साल्ट लेक सिटीमधील मूळ निवासी लेलेचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आणि फॉलोअर्स आहेत. परिणामी तिची ही मुलाखत बरीच गाजताना दिसत आहे.   

6/6

actress influencer Lala Kent plans sperm donor baby

जीवनात यापूर्वी असं काही घडून गेलंय, ज्यामुळं मनात बरीच भीती आहे असं सांगताना येणाऱ्या दिवसांमध्ये आपण कोणासोबतही कोणत्याही नात्यात अडकू इच्छित नसल्याचं तिनं स्पष्ट केलं.