रिंकू राजगुरुची सोयरिक जुळणार? फोटोमुळे चर्चांना उधाण

'सैराट' फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. 

| Aug 25, 2024, 17:18 PM IST
1/6

रिंकू राजगुरु

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. 

2/6

लाखो फॉलोअर्स

रिंकू राजगुरु अभिनयासोबतच तिच्या हटके लुकने देखील चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. 

3/6

प्रचंड सक्रिय

'सैराट'मधून प्रसिद्ध झालेली रिंकू राजगुरु अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. 

4/6

नवीन लूक

नुकतेच अभिनेत्रीने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. 

5/6

कपाळी कुंकू

या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूने कपाळी कुंकू, हातात मॅचिंग बांगड्या, दुसऱ्या हातात घड्याळ आणि केसात गजरा लावला आहे. तिचा हा लूक सध्या खूपच चर्चेत आहे. 

6/6

कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या या नवीन लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यासोबतच तिने या फोटोंना पॉजिटिव्ह असं कॅप्शन दिलं आहे.