कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री नर्स म्हणून करतेय काम

भारतात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. सरकारकडून सर्वांना घरात राहण्याचं, जागरुक राहण्याचं, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.

Mar 30, 2020, 16:38 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जनतेला घरीच राहून हा कोरोनाविरोधातील लढा देण्याचं सरकारकडून आवाहन करण्यात येतंय.

1/5

कोरोनाच्या लढाईत बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने 25 कोटींची मदत केली. कलाकार मंडळी त्यांच्यापरिने जागरुक राहण्याचं आवाहन करत असून मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अशातच आता अभिनेत्री शिखा मल्होत्राही कोरोनाग्रस्तांसाठी पुढे आली आहे.

2/5

अभिनेता संजय मिश्रा यांच्यासोबत 'कांचली' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोना रुग्णांची मदत करण्यासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रुग्णांची सेवा करत असल्याचं समजतंय.  

3/5

शिखा इतर डॉक्टरांसोबत कोरोना रुग्णांची सेवा करतेय. 

4/5

शिखा मल्होत्राने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून बीएससी नर्सिंगची डिग्री घेतली आहे. शिखाने आपलं कर्तव्य पार पाडत कोरोनाग्रस्तांची मदत केली आहे.

5/5

'देशाला यावेळी सर्वाधिक गरज असताना मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी मी हे करत आहे' अशा आशयाची पोस्ट शीखाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.