Adhik Maas Amavasya 2023 : तब्बल 19 वर्षांनंतर अमावस्येला दुर्मिळ संयोग! 'या' आयुष्यावर बरसणार भोलेनाथाची कृपा

Adhik Maas Amavasya 2023 : तब्बल 19 वर्षांनंतर अधिक मासातील अमावस्येला दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींच्यावर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. 

Aug 13, 2023, 12:53 PM IST

Adhik Maas Amavasya 2023 : अधिक मासातील अमावस्या काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या अमावस्येला पुरुषोत्तमी, मलामास अमावस्या असंही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी 15 ऑगस्टला दुपारी 12.42 वाजता सुरू होणार असून ती बुधवार 16 ऑगस्टला दुपारी 3.07 वाजता संपणार आहे. 

1/6

उदय तिथीनुसार 16 ऑगस्टला अमावस्येला असणार आहे. या दिवशी पितरांना तर्पण आणि दानधर्म करण्यात येतं. अधिक मास हा भगवान विष्णुला समर्पित असतो तर श्रावण हा शंकर भगवानांना.  मलमासातील अमावस्या तिथीचे आगमन खूप शुभ म्हणून ओळखं जातं. 

2/6

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी अधिक मास अमावस्या अतिशय शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबत यशाचं शिखर गाठणार आहे. पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. शत्रूंवर मात कराल. 

3/6

कन्या (Virgo)

कन्या राशीसाठी ही अमावस्या फलदायी असणार आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी ती लाभदायक ठरणार आहे. नोकरदार जे निणर्य घेतील त्याचं कौतुक होणार आहे. मित्रांसोबत सहलीला जाण्याचा बेत आखाल. 

4/6

तूळ (Libra)

अधिक मास अमावस्या तूळ राशीच्या लोकांसाठी नशिब पालटणारं ठरणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्याने तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. 

5/6

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अधिक मास अमावस्ये चांगली असणार आहे. व्यापारी लोकांना धनलाभा होणार आहे. पाटर्नरशीपमधील बिझनेसमध्ये लाभ होईल. नोकरदार वर्ग कामाच्या ठिकाणी व्यस्त असणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. 

6/6

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी अमावस्या शुभ ठरणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण असल्याने मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप शुभ असणार आहे. तुमचं काम चांगल्या प्रकारे मार्गी लागणार आहे.  (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)