World Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?

ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या. 

Oct 01, 2023, 09:02 AM IST
1/8

वर्ल्ड कपचा थरार 5 ऑक्टोबरपासून रंगणार असून World Cup 2023 चा मानकरी कोण आहे हे 19 नोव्हेंबरला समजणार आहे. यंदा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. पण भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी खडतर प्रवास करावा लागणार आहे.   

2/8

रोहित शर्माची टीम वर्ल्डकप स्पर्धेत 34 दिवसांच्या आत 9 शहरांमध्ये 9 लीग सामने खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाला सुमारे 8400 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. 

3/8

जर भारताने सेमी फायनल आणि नंतर फायनल गाठली तर हा प्रवास 42 दिवसांत 11 सामन्यांमध्ये 9700 किलोमीटरचा होणार आहे. म्हणजे वर्ल्ड कप काबीज करण्यासाठी भारतीय टीमला  9700 किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. 

4/8

नेमकं काय आहे हे गणित समजून घेऊयात. भारताची मॅच ही रात्री 11 वाजता संपणार आहे. त्यानंतर दर तिसऱ्या दिवशी त्यांना दुसऱ्या सामना स्थळी पोहोचण्यासाठी विमान पकडावे लागणार आहे. 100 ओव्हरची मॅच खेळाल्यानंतर भारतीय टीमसाठी हे खूप हेटिक असणार आहे. 

5/8

वर्ल्डचा वेळापत्रक पाहिलं तर भारतीय टीम हा असा संघ आहे जो संपूर्ण स्पर्धेत 9 शहरांमध्ये मॅच खेळणार आहे. इतर टीमचं बोलायचं झालं तर बाकी टीम हे एका शहरात दोन मॅच खेळणार आहे. 

6/8

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय टीमला चेन्नई ते दिल्ली 1761 किमीचा प्रवास करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील मॅचसाठी दिल्ली ते अहमदाबाद 775 किमी, अहमदाबाद ते पुणे 516 किमी, पुणे ते धरमशाला 1936 किमी, धर्मशाला ते लखनऊ 748 किमी असा प्रवास करायचा आहे. त्यानंतर लखनऊ ते मुंबई 1190 किमी, मुंबई ते कोलकाता 1652 किमी आणि कोलकाता ते बेंगळुरू 1544 किमी असा एकूण 8361 किलोमीटर प्रवास भारतीय टीमला करायचा आहे.

7/8

पाकिस्तानला हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांमध्ये प्रत्येकी दोन मॅच खेळायचे आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. बाबर आझमच्या टीमला एकूण 6849 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे.   

8/8

तर पाच वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला मात्र भारतापेक्षा कमी प्रवास करावा लागणार आहे.  ऑस्ट्रेलियाला 6907 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या टीमला वर्ल्डकप स्पर्धेसाठी 8171 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.