अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'नंतर कार्तिकचा नंबर, 'या' दिवशी रिलीज होणार 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर

अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चा ट्रेलर या दिवशी रिलीज होणार आहे. 

| Oct 08, 2024, 13:52 PM IST
1/7

दिवाळीत 2 चित्रपट

दिवाळीला बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पहिला अजय देवगनचा 'सिंघम अगेन' आणि दुसरा कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'

2/7

सिंघम अगेन

नुकताच अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अजय देवगनसोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर आणि इतर कलाकार देखील आहेत. 

3/7

'भूल भुलैया 3'

'सिंघम अगेन'नंतर आता 'भूल भुलैया 3'च्या ट्रेलर रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीजची तारीख देखील जाहीर झाली आहे. 

4/7

9 ऑक्टोबर

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3'या चित्रपटाचा ट्रेलर 9 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

5/7

ड्रामा आणि रोमान्स

'भूल भुलैया 3'च्या ट्रेलरमध्ये हॉरर, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्स बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा 3 मिनिटांचा असल्याचे म्हटले जात आहे. 

6/7

कलाकार

'भूल भुलैया 3' या चित्रपटात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि राजपल यादव हे देखील असणार आहेत. 

7/7

टीझर

27 सप्टेंबरला या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. हा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.