Lockdown : संपूर्ण देशात शुकशुकाट, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

संपूर्ण भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार १००वर पोहोचला आहे.

Mar 31, 2020, 14:54 PM IST

संपूर्ण भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार १००वर पोहोचला आहे. शिवाय २९ जणांचा या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या धोकादायक विषाणूसह लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात  १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 

1/6

पटना

पटना

बिहारची राजधानीअसलेल्या पटनामध्ये कोरोना व्हायररसचा वाढता प्रकोप लक्षात घेता सरकारने याठिकाणी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या सातव्या दिवशीही मंदिरात भक्तांची गर्दी कमी होती.

2/6

लखनऊ

लखनऊ

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमदध्ये देखील लॉकडाऊनचं पालन होताना दिसत आहे. 

3/6

आंध्रप्रदेश

आंध्रप्रदेश

आंध्रप्रदेशमधील कुरनूल भागात पोलीस घोड्यांवर स्वार होवून परिसरात करडी नजर ठेवून असतात. 

4/6

आंध्रप्रदेश

आंध्रप्रदेश

शिवाय पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर गुलाबी रंगाने कोरोना व्हायरसचं चित्र साकारण्यात आलं आहे.

5/6

हैद्राबाद

हैद्राबाद

याठिकाणी देखील कोरोना व्हायरसमुळे शुकशुकाट आहे.

6/6

श्रीनगर

श्रीनगर

लॉकडाऊनमुळे श्रीनगरमधील प्रसिद्ध डल तलाव देखील शांत आहे.