चांद्रयान -3 पाहिल्यावर US च्या वैज्ञानिकांनी केली होती 'ही' मागणी? ISRO चीफ सोमनाथ यांचा मोठा खुलासा

भारताची चांद्रयान -3 मोहिमेचे जगभरात कौतुक होत आहे. याचे श्रेय जात आहे ते ISRO च्या टीमला.

Oct 15, 2023, 22:48 PM IST

Chandrayaan-3: भारताची चांद्रयान -3 मोहिम यशस्वी झाली आहे. या मोहिमेच्या यशामुळे भारताचे जगभरात कौतुक होत आहे. चांद्रयान -3 पाहिल्यावर हे  US च्या वैज्ञानिकांनी काय मागणी केली होती याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी  मोठा खुलासा केला आहे. 

1/8

भारताची चांद्रयान -3 मोहिमे यशस्वी होण्यामागे  ISRO च्या टीमचे मोठे योगदान आहे. 

2/8

23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवाला यशस्वी लँडिंग केले.  चंद्रावर लँडिंग करण्याचा पराक्रम करणारा अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर भारत हा चौथा देश बनला आहे.  

3/8

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सोमनाथ यांनी हा खुलासा केला आहे. 

4/8

 ISRO चा चांद्रयान -3 हा प्रोजक्ट पाहून NASA-JPL टीम भारावून गेली. तुम्ही हे तंत्रज्ञान आम्हाला विका अशी मागणी अमिरिकेच्या वैज्ञानिकांनी केल्याचे सोमनाथ यांनी सांगितले.

5/8

चांद्रयान -3 कशा प्रकारे लाँच केले जाईल. चंद्रावर याचे लँडिग कसे होईल? चांद्रयान -3 नेमकं कस काम करेल याबाबत सर्व माहिती आम्ही NASA-JPL टीमला दिली असे सोमनाथ यांनी सांगितले.

6/8

NASA-JPL मधील टीम चांद्रयान -3 पाहण्यासाठी जेट प्रोपल्शन लॅबमध्ये आली होती. चांद्रयान -3 चे डिजाईन आणि तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले.

7/8

JPL ही संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) द्वारे निधी दिला जातो. यूएस मधील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) द्वारे याचे मॅनेजमेंट केले जाते. येथे अनेक संशोधक संशोधन करत असतात.

8/8

चांद्रयान -3 लाँच होण्यापूर्वी  NASA-JPL मधील तज्ञांना ते पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.