डोंगरावर वसलेली विरारची जीवदानी माता; 1400 पायऱ्या चढून गेल्यावर होते देवीचे दर्शन

विरार येथील प्रसिद्ध जीवदानी माता मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातो. 

Oct 15, 2023, 17:09 PM IST

Jivdani Temple Virar, Navratri 2023 :  नवरात्र उत्सवाचा शुभारंभ झाला आहे. यानिमित्ताने डोंगरावर वसलेल्या विरारची जीवदानी माता मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. जाणून घेवूया जीवदानी माता मंदिराचा इतिहास. 

1/7

 विरारची जीवदानी माता डोंगरावर वसलेली आहे. 1400 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते.  

2/7

सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे. तर उजव्या हाताने देवी माता भाविकांना आशीर्वाद देत आहे.

3/7

महाराष्ट्रातील 18 शक्तीपिठांपैकीही हे एक स्थान असल्याचेही सांगितलं जातं. 

4/7

जीवदानी मातेच्या मंदिराचा पाया सतराव्या शतकात रचला गेल्याचे म्हटले जाते. 

5/7

जीवनदानी मातेचं मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्‍यंत प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील एका गुफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती.

6/7

नवसाला पावणारी देवी अशी विरारच्या जीवदानी देवीचा अख्यायिका आहे. 

7/7

विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला उंच डोंगरावरिल जीवधन गडावर जीवदानी आईचं मंदिर वसलेले आहे.