अभिनेता प्रभास आणि अनुष्का शेट्टीने बांधली गुपचूप लग्नगाठ; फोटो व्हायरल

प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांच्या मनात आनंदाचं वातावरम तयार झालं आहे.  या फोटोंनी चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या फोटोंमध्ये दोघंही विवाहित असून त्यांना एक मुलगीही आहे. अनेक चाहत्यांना हे सुखी कुटुंब हवं होतं, जे प्रत्यक्षात पूर्ण झालं नसेल, पण एआय टूलने ते नक्कीच पूर्ण केलं आहे.

Oct 10, 2023, 16:14 PM IST

मुंबई : प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांच्या मनात आनंदाचं वातावरम तयार झालं आहे.  या फोटोंनी चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या फोटोंमध्ये दोघंही विवाहित असून त्यांना एक मुलगीही आहे. अनेक चाहत्यांना हे सुखी कुटुंब हवं होतं, जे प्रत्यक्षात पूर्ण झालं नसेल, पण एआय टूलने ते नक्कीच पूर्ण केलं आहे.

 

1/7

खरंतर, हे फोटो AI जनरेटेड  आहेत. म्हणजेच हे फोटो खरे नसून ते AI जनरेटेड  आहेत. मात्र तरीही चाहते हे फोटो पाहून खूप  खुश आहेत. जरी खऱ्या आयुष्यात असं काही झालं नसेल तरी प्रभास आणि अनुष्काच्या या फोटोंमुळे त्यांच्या चाहत्यांची मनापासून इच्छा पूर्ण झाली आहे.

2/7

या फोटोमध्ये अनुष्का शेट्टी वधू बनली आहे आणि प्रभास देखील तिच्यासोबत वराच्या रुपात उभा आहे. AI ने केवळ प्रभास आणि अनुष्काच्या लग्नाचे फोटोच तयार केले नाहीत तर त्यांची मुलगी देखील तयार केली आहे.  

3/7

फोटोंमध्ये प्रभास आणि अनुष्का त्यांच्या मुलीला त्यांच्या मांडीवर घेऊन बसल्याचं दिसत आहेत.  

4/7

चाहत्यांचं म्हणणे आहे की, प्रभास आणि अनुष्काचं लग्न झालं  आहे आणि त्यांना मुलगी झाली तर त्यांचं सुखी कुटुंब असं दिसेल.अनुष्का आणि प्रभास यांनी एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.    

5/7

त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्या. मात्र दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही. दोघंही आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.  

6/7

प्रभास आणि अनुष्काची भेट तेलुगू चित्रपट बिल्लाच्या सेटवर झाली होती. दोघांचंही बॉन्डिंग खूप मजबूत आहे.

7/7

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, प्रभास लवकरच सालारमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो दीपिका पदुकोणसोबत कल्की 2898 एडीमध्ये दिसणार आहे.