राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच! विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या निकषावर निकाल दिला; जाणून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे

राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा मूळचा अजित पवारांचाच असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. जाणून घ्या या निकालातील महत्त्वाचे मुद्दे.  

Feb 15, 2024, 19:26 PM IST
1/7

राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा मूळचा अजित पवारांचाच असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. जाणून घ्या या निकालातील महत्त्वाचे मुद्दे.  

2/7

निवडणूक आयोगाने याआधी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. त्यात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.   

3/7

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून यासंदर्भातला निर्णय घेतला गेला असल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं आहे.   

4/7

"30 जूनला अजित पवारांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करत असताना शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला होता. त्यावरुनच पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट झालं. 29 जूनपर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वावर कोणताही वाद नव्हता"  

5/7

"मी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले आहेत. पण हा युक्तिवाद ऐकल्यानंतर पक्षाध्यक्ष कोण आहे या निर्णयापर्यंत मी पोहोचलेलो नाही"  

6/7

"अजित पवार गटाला 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा असून शरद पवार गटाने त्यांना आव्हान दिलेलं नाही. यावरुन दोन्ही गटांचं संख्याबळ स्पष्ट होत आहे. अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षावर मी आलो आहे"  

7/7

"अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षावर आल्याने शरद पवार गटाकडून सादर केलेल्या अपात्रता याचिका मी फेटाळत आहे. शरद पवार गटाचे आमदारही अपात्र नाहीत"