PHOTO : ऐश्वर्याला पाहता क्षणी पडला प्रेमात, करिश्मा कपूरशी मोडलं लग्न; हिट चित्रपटानंतरही सुपरस्टारच्या लेकाचं करिअर 'या' कारणामुळे फ्लॉप

Akshay Khanna Birthday: बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक अशी अक्षय खन्ना ची ओळख आहे. सुपरस्टार मुलगा असून त्याच्या अभिनयाने त्याने एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली. ऐश्वर्या राय बच्चन, कतरिनासोबत परद्यावर रोमान्स केला. पण खऱ्या आयुष्यात करिश्मा कपूरशी लग्न मोडल्यानंतर आजही अविवाहित आहे हा अभिनेता. 

Mar 28, 2024, 11:00 AM IST
1/9

वडील 70 च्या दशकातील सुपरस्टार त्यांच्या लूकमुळे तरुणी घायाळ झाल्या होत्या. या सुपरस्टारच्या मुलाने 22 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण वयाच्या 19 व्या वर्षीपासूनच त्याला केसगळतीची समस्या सुरु झाली होती. 

2/9

त्याची कारकीर्द जशी जशी पुढे जात होती केसगळतीची समस्याही झपाट्याने वाढत होती. त्याच्या या समस्यामुळे चित्रपटातून दोनदा ब्रेक घावा लागला. 27 वर्षांच्या करिअरमध्ये त्याने पाच वर्ष घरात काढली. 

3/9

आम्ही बोलत आहोत विनोद खन्ना यांच्या मोठा मुलगा अक्षय खन्ना बद्दल. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला दृष्यम 2 तो अनेक वर्षांनंतर दिसला होता. आता लवकरच तो ओटीटीवरुन पदार्पण करणार आहे. रवीना टंडनसोबत 'लिगेसी' या वेब सीरिजमध्ये तो झळकणार आहे. 

4/9

अक्षय खन्ना आज 49 वर्षांचा झाला असून विनोद खन्ना निर्मित हिमालय पुत्र या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमधून एन्ट्री केली. अक्षय कुमारला अभ्यासात रस नव्हता उटीमधून 11वी आणि 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर परीक्षेत नापास होईल म्हणून त्याने कॉलेजची परीक्षाच दिली नाही. खूप हिंमत करुन अक्षयने विनोद खन्नाला शिक्षणाची आवड नसल्याचं सांगितलं आणि चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलवून दाखवली. विनोद खन्ना त्यावेळी हे ऐकून खूप संतापले होते. 

5/9

पहिल्या वहिल्या हिमालय पुत्र फ्लॉप झाला मात्र अक्षयला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा स्क्रीन अवॉर्ड मिळाला होता. 2000 साली अक्षयने फ्लॉप चित्रपटांमुळे एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर दिल चाहता है, हमराज या चित्रपटातून तो झळकला. त्यानंतर त्याने पुन्हा 2012 ते  2016 दुसरा ब्रेक घेतला. 

6/9

त्यानंतर तो ढिशूम, मॉम, इत्तेफाक, सेक्शन 375 या चित्रपटात दिसला. त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने 40 चित्रपट केले त्यातील फक्त 8 चित्रपटत हे यशस्वी ठरले. 

7/9

तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल की, आ अब लौट चले आणि ताल या चित्रपटात काम करताना अक्षय ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता, असं खुद्द अक्षयने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

8/9

त्यानंतर त्याच्या आयुष्यात तारा शर्मा आली. ते दोघे अनेक वर्ष एकत्र होते पण काही कारणामुळे त्यांचं ब्रेकअप झालं. 

9/9

विनोद खन्ना यांनी रणधीर कपूर यांच्याकडे करिश्मा आणि अक्षय यांच्या लग्नाची इच्छा बोलून दाखवली. मात्र करिश्माच्या आईने या नात्याला नकार दिला. यानंतर अक्षय आजही अविवाहित आहे.