Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'या' गोष्टी! लक्ष्मीची राहिल सदैव कृपा

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. 

Apr 21, 2023, 15:39 PM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी केल्याने घरात कायम लक्ष्मी मातेची कृपा राहते. म्हणून यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदी केली जाते. जर तुम्ही राशीनुसार खरेदी केल्यास तुम्हाला अधिक लाभ होतो. (akshaya tritiya 2023 buy gold and this metal according to zodiac sign astrology in marathi )

 

1/11

राशीनुसार खरेदी करा वस्तू

अक्षय्य तृतीया शनिवारी 22 एप्रिलला 2023 ला साजरा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही राशीनुसार खरेदी केली तर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

2/11

कुंभ (Aquarius)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी लोखंडी धातू खरेदी करा. याशिवाय चांदी आणि सोन्याचे धातू घेतल्यासही फायदा होईल. 

3/11

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी स्टील आणि लोखंडी वस्तू खरेदी करणे शुभ मानलं जातं. 

4/11

मीन (Pisces)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीन राशीच्या लोकांसाठी पितळ धातू खरेदी करा. 

5/11

सिंह (Leo)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी तांब्याचा धातू खरेदी करा. 

6/11

धनु (Sagittarius)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी सोन्यासोबत पितळ धातूची खरेदी करावी. 

7/11

तूळ (Libra) आणि कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदीचा धातू खरेदी करा. 

8/11

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांब्याचा धातू खरेदी करा. 

9/11

कन्या (Virgo) आणि मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कांस्य धातू खरेदी करावं. 

10/11

मेष (Aries)

या राशीच्या व्यक्तीने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि तांबे धातू खरेदी करावे.   

11/11

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदी आणि सोन्याची नाणी खरेदी करावी. (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)