Skin Care Tips : पावसाळ्यात होऊ शकते अ‍ॅलर्जी, अशी घ्या त्वचेची काळजी

पावसाळ्यात अनेकांना भिजून पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण पावसाळ्यात अनेक त्वचाविकारांचा धोकाही असतो. ओलावा आणि पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने अनेक संसर्गजन्य आणि ऍलर्जी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ॲलर्जी आणि इन्फेक्शनपासून स्वतःला कसे वाचवायचे जाणून घेऊया.

Jul 13, 2024, 18:25 PM IST
1/6

पावसाळ्यातील आजार:

पावसाळ्यातील उबदार आणि ओलसर वातावरण हे बुरशीजन्य संसर्ग आजारांचे प्रजनन स्थळ आहे. अशा परिस्थितीत दाद, ऍथलीटचे पाय आणि यीस्ट इन्फेक्शन यासारख्या समस्या सामान्य आहेत.

2/6

स्वच्छतेची काळजी घ्या:

पावसाळ्यात त्वचेची आणि संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने नियमित आंघोळ करा.  

3/6

योग्य कपडे घाला:

पावसाळ्यामध्ये फिटिंग कपडे घाला. जसे की, कापसापासून बनलेले कपडे, ज्यामुळे हवेचा संचार होऊ पाण्याची वाफ शोषली जावू शकेल. ज्यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळत राहिल. 

4/6

एंटीफंगल उत्पादने वापरा:

पावसाळ्यामध्ये अनेकदा बोटांमध्ये आणि इतर ठिकाणी संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत बोटांमध्ये एंटीफंगल पावडर किंवा क्रीम लावा. 

5/6

पुरेसे पाणी प्या:

पावसाळ्यात आपल्या त्वचेचे हायड्रेशन राखण्यासाठी आणि आपल्या शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पुरेसे पाणी प्या. 

6/6

संतुलित आहार:

पावसाळ्यात जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा.