'गिनते गिनते रुकेगा नही साला', Pushpa 2 साठी Allu Arjun नं घेतलं इतकं मानधन?

Allu Arjun Pushpa 2 fees : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनन (Allu Arjun) गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2) मुळे चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तर चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक देखील समोर आला होता. त्यानंतर सगळीकडे पुष्पाच्या लूकची चर्चा होऊ लागली होती. दरम्यान, आता अल्लू अर्जुननं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं ही बातमी समोर आली आहे. 

| Apr 10, 2023, 16:25 PM IST
1/7

allu arjun pushpa 2 fees

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 

2/7

allu arjun pushpa 2 fees

अल्लू अर्जुनचे चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यावर लोक रील बनवू लागले होते. तर चित्रपटातील सामी सामी गाण्यावर तर नेटकऱ्यांनी सेलिब्रिटींनी देखील डान्स केला. 

3/7

allu arjun pushpa 2 fees

अल्लू अर्जुननं जेव्हा पुष्पा चित्रपट केला, तेव्हापासून त्यानं किती मानधन घेतलं अशी चर्चा सुरु झाली होती. तर दुसरा भाग येताच पुन्हा एकदा त्यानं किती मानधन घेतलं असेल असा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला.

4/7

allu arjun pushpa 2 fees

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटासाठी अल्लू अर्जुननं 45 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

5/7

allu arjun pushpa 2 fees

'पुष्पा 2' साठी अल्लू अर्जुननं 85 कोटी मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात सगळ्यांती लाडकी रश्मिका मंदना दिसणार आहे. 

6/7

allu arjun pushpa 2 fees

'पुष्पा 2' या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री सई पल्लवी दिसण्याची शक्यता आहे. 

7/7

allu arjun pushpa 2 fees

अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं सगळ्यांचे लक्ष. अल्लू अर्जुननं साडी नेसली आहे. त्यासोबत हातात बांगड्या, बंदूक, गळ्यात लिंबाची माळ, कानात झुमके, गळ्यात हार आहे.  (All Photo Credit : Allu Arjun Instagram)