अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस 59 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या कोण आहे लॉरेन सांचेझ?

May 23, 2023, 19:31 PM IST
1/6

jeff bezos wife lauren sanchez

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी वयाच्या 59 व्या वर्षी त्यांची गर्लफ्रेन्ड लॉरेन सांचेझसोबत साखरपुडा केला आहे. 2019 मध्ये, बेझोस यांनी लॉरेन सांचेझसोबतच्या नात्याबाबत सर्वांना माहिती दिली होती.

2/6

jeff bezos wife lauren sanchez engaged

जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ हे 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी साखरपुडा केला आहे.

3/6

jeff bezos wife

2019 मध्ये जेफ बेझोस यांचा त्यांची पहिली पत्नी मॅकेन्झी स्कॉटसोबत घटस्फोट झाला तेव्हा त्यांचे नाते समोर आले होते. मॅकेन्झी यांना घटस्फोटामधून 38 अब्ज डॉलर मिळाले होते. ज्यापैकी अर्धे त्यांनी दान करणार असल्याचे म्हटले होते.

4/6

lauren sanchez work

53 वर्षीय लॉरेन सांचेझ या ब्रॉडकास्ट पत्रकार होत्या आणि आता त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेच. याशिवाय त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.

5/6

lauren sanchez movie

लॉरेन सांचेझ यांनी 'द लाँगेस्ट यार्ड', 'द डे आफ्टर टुमारो', 'फाइट क्लब' आणि 'टेड 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय, त्या हेलिकॉप्टर पायलट तसेच ब्लॅक ऑप्स एव्हिएशनच्या संस्थापक आहेत.

6/6

lauren sanchez first husband

लॉरेन सांचेझ यांनी यापूर्वी पॅट्रिक व्हाइटलेस यांच्याशी लग्न केले होते. त्यांचे नाते 13 वर्षे टिकले. या लग्नातून त्यांना दोन मुले आहेत. (सर्व फोटो - @laurenwsanchez/instagram)