महाराष्ट्रात जपानी मंदिर! अनोखा ड्रॅगन पॅलेस

Ambedkar Jayanti 2024: नागपूरला गेल्यावर  ड्रॅगन पॅलेस टेम्पलला नक्की भेट द्या. 

| Apr 14, 2024, 21:18 PM IST

Dragon Palace Temple, Nagpur : महारष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी बौद्ध विहार अर्थात बौद्ध मंदिर आहेत. नागपूरपासून 14 किमी अंतरावर कामठी येथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. जपानी स्थापत्यशैलीतील बांधलेले मंदिर खरोखरच अनोखे आहे. 

1/7

महाराष्ट्रात शेकडो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. असेच एक मंदिर नागपुरमध्ये आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे जे जपानी स्थापत्यशैलीतील बांधल आहे. 

2/7

येथे भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. अखंड चंदनाच्या लाकडापासून ही मुर्ती बनवण्यात आली आहे. सहा फूट उंच मूर्ती 864 किलोग्राम वजनाची आहे. पहिल्या मजल्यावर मुख्य विशाल असे प्रार्थनागृह आहे येथे भगवान बुद्धांची मूर्ती

3/7

या बौद्धविहारात तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह, वाचनालय आणि फोटो गॅलरी आहे.  कप पहिल्या मजल्यावर  बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.   

4/7

10 एकर जागेत हे भव्य ड्रॅगन पॅलेस बांधण्यात आले आहे. जपानी स्थापत्यशैलीतील बांधलेले हे एकमेव धार्मिक स्थळ आहे. 

5/7

1999 मध्ये जपानमधील ओगावा समाजाने दान केलेल्या पैशातून मंदिराची स्थापना करण्यात आली.   

6/7

ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर, ज्याला नागपूरचे लोटस टेंपल असेही म्हणतात. 

7/7

 नागपूरपासून 14 किमी अंतरावर कामठी येथे ड्रॅगन पॅलेस मंदिर आहे. हे बौद्ध मंदिर दरवर्षी पर्यटकांना आकर्षित करत आहे.