सेल्समनचा मुलगा बनला जगातील ताकदवान व्यक्ती, जाणून घ्या Joe Biden यांचा प्रवास

Jan 20, 2021, 20:16 PM IST
1/8

एका सर्वसाधारण सेल्समनचा मुलगा

एका सर्वसाधारण सेल्समनचा मुलगा

जो बायडेन यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1942 रोजी स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया येथे आयरिश ख्रिश्चन कुटुंबात झाला. ते 10 वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब न्यू कॅसलमध्ये गेले. तिथे त्यांचे वडील कार सेल्समनची नोकरी करत होते. इथे बायडेन यांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये राहत होते.यामध्ये त्यांचे आई-वडील आणि चार भाऊ-बहीण होते. जो बिडेन यांनी डेलॉव्हर्स विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली. (फोटो साभार- JoeBiden Twitter)

2/8

29 वर्षाच्या वयात बनले सिनेटर

29 वर्षाच्या वयात बनले सिनेटर

त्यानंतर बायडेन यांनी स्यराकेस युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ येथे प्रवेश घेतला. जिथे त्यांनी 1968 मध्ये ज्युरिस डॉक्टरेट मिळवली. ज्युरीस डॉक्टर पदवी ही अमेरिकेतील कायद्यातील सर्वोच्च पदवी असून ती व्यावसायिक ओळख मिळवून देते.  पुढच्या वर्षी तो डेलावेर बारमध्ये सामील झाले. वकिली करताना त्यांनी राजकारणात नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. वयाच्या 29 व्या वर्षी ते 1972 मध्ये सिनेटवर निवडून गेले. 1973 ते 2009 पर्यंत त्यांनी सिनेटमध्ये काम केले.  (फोटो साभार- JoeBiden Twitter)

3/8

यशस्वी होण्यासाठी सर्वकाही

यशस्वी होण्यासाठी सर्वकाही

बायडन यांच्या आयुष्यात यशाची सुरुवात झाली तेव्हाच दु:खाचा डोंगर देखील कोसळू लागला.1972 मध्ये ते सिनेटवर निवडून आल्यानंतर एका आठवड्याl त्यांची पहिली पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. रुग्णालयाच्या कक्षातून त्यांनी पहिल्या सिनेट मुदतीची शपथ घेतली. इथे त्यांची दुध पिणारी 2 मुलं होती  जी कार अपघातातून वाचली होती. (फोटो साभार- JoeBiden Twitter)

4/8

राष्ट्रपती पदाची शर्यत खूप मोठी

राष्ट्रपती पदाची शर्यत खूप मोठी

1987 मध्ये त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रपती पदाचे कॅम्पेनिंग सुरु केलं पण हे कॅम्पेनिंग फार काळ टीकू शकलं नाही. त्यांच्याविरोधात ब्रिटिश राजकारण्यांचे भाषण चोरल्याचा आरोप झाला. त्यानंतर पुढच्या वर्षी, 1988 मध्ये, जो बिडेन यांना मेंदूच्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले, ज्यामध्ये त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. व्हाईट हाऊस कॅम्पेनमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकला असता असेही डॉक्टरांनी म्हटले होते. 2008 मध्येही त्यांनी पक्षात उमेदवारीसाठी प्रचार केला, पण जास्त पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी आपला विचार बदलला. शेवटी, जेव्हा ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले, तेव्हा त्यांना ओबामाचा उजवा हात होण्याची संधी मिळाली.  (फोटो साभार- JoeBiden Twitter)

5/8

कोसळला दु:खाचा डोंगर

कोसळला दु:खाचा डोंगर

मे 2015 मध्ये त्यांचा मोठा मुलगा बीयू बिडेन याचा मेंदूच्या कर्करोगाने मृत्यू झाला. यामुळे जो बिडेन हादरले. त्यांची राजकीय कारकीर्दही ठप्प झाली. पाच वर्षांनंतर, बायडेन यांनी राजकीय कारकीर्दीकडे परत येण्याचे धाडस केले. या कारणामुळे आपल्या भाषणतून त्यांनी आरोग्यसेवा आणि हवामान बदलांची अनेक आश्वासने दिली. ओबामा यांच्या काळात सन 2009 ते 2017 या काळात आरोग्यसेवेत झालेले काम पुढे घेऊन जाऊ असेही ते म्हणाले. (फोटो साभार- JoeBiden Twitter)

6/8

बायडेन आता 'मध्यम वर्गीय जो' नाहीत

बायडेन आता 'मध्यम वर्गीय जो' नाहीत

जो बिडेन आपल्या लोकांमध्ये 'मध्यमवर्ग जो' म्हणूनही ओळखले जातात. परंतु ते आता मध्यमवर्गीय व्यक्ती राहीले नाहीत. तर जगातील सर्वात सामर्थ्यवान देशाचे ते अध्यक्ष झाले आहेत. ते आता लक्षाधीश आहेत. 2020 मध्ये निवडणूक सुरू होण्यापूर्वी त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेनुसार, फोर्ब्सच्या अंदाजानुसार त्याच्याकडे 9 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.  (फोटो साभार- JoeBiden Twitter)

7/8

ओबामा सरकारमध्ये होते उपराष्ट्रपती

ओबामा सरकारमध्ये होते उपराष्ट्रपती

यापूर्वी, बिडेन हे ओबामा यांच्या कारकीर्दीत उपराष्ट्रपती होते. त्यापूर्वी ते 1973 ते 2009 पर्यंत सिनेटवर होते. सिनेटच्या नोंदीनुसार, या काळात त्यांचा पगार वार्षिक 42,500 डॉलर वरुन 1,74,000 डॉलर्स इतका वाढला. उपराष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचा वार्षिक पगार वार्षिक 230,000 डॉलर्सपर्यंत वाढला. (फोटो साभार- JoeBiden Twitter)

8/8

इतकी आहे संपत्ती

इतकी आहे संपत्ती

सीबीएसच्या मते, नोव्हेंबर 2009 मध्ये जो बिडेन यांची एकूण मालमत्ता केवळ  30 हजार डॉलर होती. उपाध्यक्षपदाचा पूर्ण कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी जुलै 2019 मध्ये आपली आर्थिक मालमत्ता जाहीर केली. जो बिडेन आणि त्यांच्या पत्नीची एकूण मालमत्ता 2017-18 मध्ये 15 दशलक्ष डॉलर्सने वाढल्याचे समोर आले. (फोटो सौजन्य- JoeBiden Twitter)