Donald Trump यांची लहान मुलगी Tiffany चा साखरपुडा, पाहा फोटो

Jan 20, 2021, 15:38 PM IST
1/5

व्हाइट हाऊसच्या क्षणाची आठवण

व्हाइट हाऊसच्या क्षणाची आठवण

माइकल बुलोस (Michael Boulos) सोबत फोटो शेयर करताना टिफनी ट्रंप (Tiffany Trump) ने पोस्ट लिहीलीय. व्हाइट हाऊसमध्ये ऐतिहासिक क्षण आपल्या परिवारासोबत सेलिह्रेट करणं आणि गोड आठवण तयार करणं हा एक सन्मान होता. पण माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच्या क्षणांपेक्षा नाही. नव्या टप्प्यासाठी मी खूप उत्साही आहे.

2/5

होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो

होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो

टिफनी ट्रंप (Tiffany Trump) ने आपला होणारा नवरा मायकल बुलोस (Michael Boulos) सोबत फोटो शेयर केलाय. माझ्या आयुष्याचं प्रेमासोबत माझा साखरपुडा आहे. आम्ही आता पुढच्या टप्प्याची वाट पाहतोय.

3/5

ट्रम्प यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी टिफनी

ट्रम्प यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी टिफनी

27 वर्षांच्या टिफनी ट्रम्प (Tiffany Trump) डोनाल्ड ट्रंप आणि दुसरी पत्नी मार्ला मेपल्स (Marla Maples) यांची एकुलती एक मुलगी आहे. जॉर्ज टाउन वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमधून पदवी घेतलीय.

4/5

टीफनीचा होणारा नवरा कोण ?

टीफनीचा होणारा नवरा कोण ?

टिफनीचा होणारा नवरा माइकल बुलोस (Michael Boulos)  23 वर्षांचा आहे. नायझेरियाच्या लोगोस येथून सुरुवातीचे शिक्षण केल्यानंतर लंडनमधून त्याने पदवी घेतली. लंडनमध्ये मायकल आणि टीफनी यांची पहिल्यांदा ओळख झाली.

5/5

डोनाल्ड ट्रंप यांना 5 मुलं

डोनाल्ड ट्रंप यांना 5 मुलं

डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांना 5 मुलं आहेत. ट्रम्प यांना सध्याची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्याकडून बॅरन नावाचा 14 वर्षाचा मुलगा आहे. तर आधीची पत्नी इवाना ट्रम्पपासून ट्रम्प ज्यूनियर (43), इवांका (39) आणि एरिक ( 37) तीन मुलं आहेत.