राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले 'आदर्श म्हणून नेहमी...'

Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं.. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.

| Jul 11, 2024, 16:45 PM IST
1/5

125 कोटीचं बक्षीस

बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सर्व खेळाडू, प्रशिक्षक वर्ग, सपोर्टींग स्टाफमध्ये वाटून दिला जाणार आहे.

2/5

मुख्य प्रशिक्षक

टीम इंडियाच्या 15 प्लेयरला 5 कोटी तर प्रशिक्षक म्हणून द्रविडला 5 कोटी रुपये मिळणार होता. तर इतर प्रशिक्षकांना 2.5 कोटी रुपये मिळणार होते. मात्र, द्रविडने यावर आक्षेप घेतला.

3/5

अडीच कोटी

बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींग कोचला जेवढं बक्षीस दिलं जातं, तेवढंच म्हणजेच अडीच कोटी रुपयेच मला द्यावेत, असं द्रविडने बीसीसीआयला सांगितल्याचं वृत्त समोर आलं होतं. 

4/5

माणुसकीची खूण

राहुल द्रविडच्या या निर्णयाचं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी कौतूक केलंय. ही खरी माणुसकीची खूण आहे, असं महिंद्रा म्हणाले.

5/5

रोल मॉडेल

दरम्यान, आता यालाच तुम्ही रोल मॉडेल म्हणाल, असंही आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात टीम इंडिया भारतात आल्यानंतर देखील त्यांनी संघाचं तोंडभरून कौतूक केलं होतं.