Radhika Merchant-Anant Ambani : लहानपणी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट दिसायचे खूप क्यूट, दोघांची लव्ह स्टोरी एकदम खास

Anant Ambani And Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडे लगीन घाई आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दोघांचा विवाह 12 जुलैला होणार आहे. त्यापूर्वी 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत - राधिका यांचं प्री वेडिंग सोहळा रंगणार आहे. 

Feb 28, 2024, 15:09 PM IST
1/7

मुकेश अंबानीचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चेंट यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

2/7

अनंत तिच्या लहानपणीच्या मैत्रीण राधिकाशी लग्न करणार आहे. राधिका आणि अनंत हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात हे फार कमी लोकांना माहिती आहे. 

3/7

राधिका ही प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. 2018 मध्ये दोघांचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यांची प्रेम कहाणी समोर आली. 

4/7

सुरुवातील या दोघांमध्ये मैत्री होती, त्यानंतर कॉलेजमध्ये त्यांची जवळीक वाढली. राधिका मर्चंटने तिचे सुरुवातीचे शिक्षण इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं. यानंतर तिने 2017 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी ग्रहण केली. 

5/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जामनगरमधील प्री वेडिंग 3 दिवसांच्या सोहळ्यात तब्बल 2500 हून अधिक डिशेस बनत आहेत. त्यामध्ये नाश्तासाठी 75, दुपारच्या जेवण्यासाठी 225 आणि रात्रीच्या जेवण्यासाठी 275 डिशेस असणार आहे. 

6/7

राधिका आणि अनंत यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले होते. हे क्यूट फोटो पाहून नेटकरी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

7/7

जामनगरमधील प्री वेडिंगसाठी जय्यत तयारी सुरु असून जामनगर ही आजी कोकिलाबेनची जन्मभूमी तर आजोबा आणि वडिलांची कर्मभूमी आहे.