परफ्युम आणि बॉडी मिस्टमध्ये फरक काय ? जाणून घेऊया त्वचेसाठी बॉडी मिस्टचे फायदे

पूर्वीच्या काळी अत्तर लावण्याला लोक फार महत्त्व देत असतं. काळानुसार अत्तराची जागा आता परफ्युम, बॉडी स्प्रे, डीओ यांनी घेतली त्यातच आता नव्यानं भर पडली ती म्हणजे बॉडी मिस्टची. परफ्युम आणि बॉडी मिस्टमध्ये फरक काय ? आणि ते कधी वापरावं याबद्दल जाणून घेऊया.   

Feb 28, 2024, 14:42 PM IST
1/7

बऱ्याच जणांचा एक थराविक परफ्युम ठरलेला असतो. सुगंधी द्रव्यं , अत्तर, परफ्युमची आवड अनेकांना असते. खरंतर परफ्युम आणि बॉडी मिस्टमध्ये हलकासा फरक असतो.    

2/7

परफ्युममयध्ये सुगंधी द्रव्याबरोबरचं अल्कोहोलचं प्रमाण थोडंफार जास्त असतं. परफ्युम त्वचेवर न लावता कपड्यावर लावलं जातं.  

3/7

 मात्र बॉडी मिस्ट तुम्ही त्वचेवर वापरू शकता. बॉडी मिस्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ते त्वचेसाठी घातक ठरत नाही. 

4/7

संवेदनशील त्वचेसाठी बॉडी मिस्ट चांगला पर्याय आहे. बॉडी मिस्ट त्नचेवर वापरल्याने सहसा अॅलर्जीचा त्रास होत नाही. 

5/7

परफ्युमच्या तुलनेत बॉडी मिस्ट फार वेळ सुगंध देच नाही. सुगंध टिकून राहण्याकरीता परफ्युममध्ये वापरले जाणारे कृत्रिम घटक बॉडी मिस्टमध्ये वापरले जात नाही.     

6/7

जर तुम्हाला परफ्युमची अॅलर्जी होत असेल तर परफ्युमला पर्याय तुम्ही बॉडी मिस्ट वापरू शकता.

7/7

जर तुम्ही ऑफिसच्या कामाकरीता जात असाल तर तुम्ही परफ्युम वापरू शकता. त्याशिवाय जर तुम्ही लग्न समारंभात जात असाल तर तुम्ही बॉडी मिस्टचा वापर करू शकता.