'पँथर ब्रॉच'नंतर अनंत अंबानीच्या लक्झरी घड्याळाची चर्चा, कोटीमध्ये असणारी किंमत ऐकून थक्क व्हाल

Anant Ambani Patek Philippe Watch: आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब असणाऱ्या अंबानी कुटुंबात (Ambani Family) नुकताच एक सोहळा पार पडला. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या NMACC चं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अनंत अंबानीची चर्चा त्याने हातात घातलेल्या घड्याळामुळे होती, कार्यक्रमात अनंत अंबानीच्या घड्याळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.   

Apr 07, 2023, 17:27 PM IST

 

 

1/7

आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब असणाऱ्या अंबानी कुटुंबात नुकताच एक सोहळा पार पडला. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या NMACC चं उद्घाटन करण्यात आलं. हा उद्घाटन सोहळा तीन दिवस पार पडला. पहिल्या दिवशी उद्धाटन झाल्यानंतर पुढील दोन दिवस पाहुण्यांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंब सहभागी झालं होतं.   

2/7

या कार्यक्रमात अंबानी यांची छोटी सून राधिका मर्चंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर दुसरीकडे अनंत अंबानीचीही चर्चा रंगली होती.   

3/7

यावेळी अनंत अंबानीची चर्चा त्याने हातात घातलेल्या घड्याळामुळे होती, कार्यक्रमात अनंत अंबानीच्या घड्याळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.   

4/7

सोशल मीडियावरही चर्चेत असलेलं अनंत अंबानीचं घड्याळ Patek Philippe ब्रँडचं रेअर लक्झरी घड्याळ आहे.    

5/7

रिपोर्टनुसार, Grandmaster Chime Watch एडिशनच्या या घड्याळात हिरे, रत्न जोडण्यात आले आहेत.   

6/7

अनंत अंबानीने ज्या एडिशनचं घड्याळ घातलं आहे, त्याची किंमत 18 कोटींहून अधिक आहे. Patek Philippe ची या एडिशनची घड्याळं फार महाग असून याच्या किंमती 27 कोटींपर्यंत जातात.   

7/7

याआधी जानेवारी महिन्यात अनंत अंबानी आपल्या महागड्या 'कार्टियर पँथऱ ब्रोच'मुळे चर्चेत आला होता. या ब्रोचची किंमत 1 कोटी 13 लाखांपर्यंत होती.