Weekend OTT Releases: विकेंडला काय करायचं प्रश्न पडला आहे? मग पाहा 'या' वेब सीरिज आणि चित्रपट
Top Web Series and Movies to Watch on Weekend: आता विकेंड सुरु झाला आहे. त्यात गुड फ्रायडेची सुट्टी आणि मग त्याला लागूनच शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आपल्याला मिळाल्या आहेत. मग आता तीन दिवस काय करायचं. कुठे फिरायला जायचं की घरीच आराम करायचा? घरीच आराम करायचं म्हटलं तर मग त्यात पण काही मनोरंजन झालं पाहिजे ना. तर तुम्ही घरी बसल्या मनोरंजन करण्यासाठी आपण ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज पाहू शकतो हे जाणून घेणार आहोत.
1/7
जुबली (Jubilee) : जुबली हा 1947 च्या बॉम्बेवर आधारीत असलेली वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे. या वेब सीरिजमध्ये अदिती राव हैदरी, अपारशक्ति खुराना, प्रोसेनजीत चॅटर्जी, राम कपूर, सिद्धांत गुप्ता आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेब सीरिज आज 7 एप्रिल रोजी प्रदर्शित झाली असून तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅट फॉर्मवर पाहू शकता. (Photo Credit : Aparshakti Khurana Instagram)
2/7
गुमराह (Gumraah) : गुमराह या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्धन केतकरनं केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर, रोनीत रॉय यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर आदित्यचा या चित्रपटात डबल रोल आहे. हा चित्रपट आज 7 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकता. (Photo Credit : Aditya Roy Kapoor Instagram)
3/7
व्योमकेश ओ पिंजरापोल (Byomkesh O Pinjrapol) : लोकप्रिय डिटेक्टिव्ह शरदिंदू बंदोपाध्याय यांच्या चिरियाखानाचे रुपांतर आणि त्यांचे पार्टनर यांना आपण या वेब सीरिजमध्ये पाहत आहोत. सत्यजीत रे यांच्या 1967 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची झलक देखील दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनिर्बन भट्टाचार्य, रिद्धिमा घोष, भास्वर चॅटर्जी आणि बाबू दत्ता रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज आपण Hoichoi वर पाहू शकतो. (Photo Credit : Anirban Bhattacharya Instagram)
4/7
5/7
आयआरएल : इन द रियल लव्ह (IRL: In Real Love) : या सीरिजमध्ये रणवीजय सिंग आणि गौहर खान हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. यावेळी चार सिंगल लोकांमध्ये असलेला रिलेशनशिप ड्रामा पाहायला मिळणार आहे. ही सीरिज प्रदर्शित झाली असून तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (Photo Credit : Rannvijay Singh Instagram)
6/7
इंडियन मॅचमेकिंग (Indian Matchmaking) : या माहितीपटाचे दिग्दर्शन हे स्मृती मुनधरा यांनी केलं आहे. या माहितीपटात प्रेक्षकांना रोमान्स पाहायला मिळाला आहे. या सीरिजमध्ये जोडपं कधी बनवली जातात ते दाखवलं आहे. पण तुम्हाला तिच्याविषयी लगेच माहिती मिळते. ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. याचा दुसरा सीजन हा 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याचा पहिला सीजन हा तुम्ही आता विकेंडला नक्कीच पाहू शकता. (Photo Credit : Netflix India Instagram)
7/7