तुम्ही विचारही करणार नाही, इतक्या कमी वयात 'या' महिला बनल्या IAS अधिकारी; पाहा टिना डाबी कितव्या स्थानावर

मुंबई : देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळख असलेली परीक्षा म्हणजे यूपीएससीची परीक्षा. कित्येक उमेदवार त्यांच्या आयुष्यतली अनेक वर्षे या परीक्षेची तयारी करतात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 महिला आयएएस ऑफिर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या कमी वयात आयएएस बनल्या आहेत.

Aug 25, 2022, 11:17 AM IST
1/5

अनन्या सिंह

अनन्या सिंह : 2015 ला वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात 51 वा रँक मिळवून अनन्या सिंह आयएएस बनल्या. 

2/5

सिमी करन

 सिमी करन : 2019 ला देशात 31 वा रँक मिळवून सिमी करन आएएस ऑफिसर बनल्या.  2019 ला सिमी जेव्हा आयएएस झाल्या तेव्हा त्यांच वय 22 वर्ष होत.

3/5

स्मिता सभरवाल

स्मिता सभरवाल : लोकप्रिय आयएएस स्मिता सभरवाल यांनी 2000 ला देशात 4 रँक मिळवला होता. वयाच्या 22 व्या वर्षी आयएएस स्मिता यांनी यूपीएससीची परीक्षा पास केली.

4/5

टीना डाबी

टीना डाबी : कायम चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी 2015 ला यूपीएससीची परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. तेव्हा त्यांच वय 22 वर्षे होतं.  

5/5

स्वाति मीणा

स्वाति मीणा : वयाच्या 22 वर्षी स्वाती मीणा यांनी 2007 ला यूपीएससी परीक्षा पास केली होती. त्यावेळी त्यांनी देशात 260 रँक मिळवला होता. दबंग आयएएस म्हणून स्वाती यांची ओळख आहे.