PHOTO : क्रिकेटर बनलेला अभिनेता! 75 मुलींना डेट केल्यानंतर 3 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी केलं लग्न

Entertainment : क्रिकेटर असलेला हा या फोटोमधील चिमुकला आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. अनेक मुलींना डेट केल्यानंतर त्याने 3 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी घाईघाई लग्न केलं. कारण ही अभिनेत्री लग्नापूर्वी आई होणार होती. 

Feb 06, 2024, 09:36 AM IST
1/12

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू वडील आणि त्यामुळे रक्तात क्रिकेट लहानपणापासूनच भिन्नभिन्नल होतं. भारतीय अंडर 19 क्रिकेट संघातून या अभिनेत्याने आपली कामगिरी दाखवली.   

2/12

मात्र म्हणतात ना नशिबात काय वेगळंच लिहून ठेवलं होतं. क्रिकेटर असलेला हा चिमुकला अभिनेत्या बनला. आम्ही बोलत आहोत अंगद बेदीबद्दल. 

3/12

वयाच्या 16 व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमधून भारतीय संघात दमदार खेळी केली होती. पण क्रिकेटला अलविदा करत त्याने बॉलिवूडचा रस्ता धरला. 

4/12

2004 साली 'काया तरन' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. बॉलिवूडच्या मैदानातही त्याने दमदार अभिनयाने सर्वांचं मनं जिंकलं. 

5/12

अंगदने 'फालतू', 'उंगली', 'पिंक', 'डियर जिंदगी', 'टायगर जिंदा है', 'सूरमा' आणि 'घूमर'  या चित्रपटातील अभिनयाने सर्वांना चकित केलं. 

6/12

अंगदबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे की, तो लेफ्ट असो या राइट दोन्ही हाताने एकसारख काम करु शकतो. अशी खासयित असलेला व्यक्ती संपूर्ण जगात 1 टक्के असतात. 

7/12

अंगदने मॉडलिंग दुनियेतही आपलं नशिब आजमावलं. तिथेही त्याने खूप नाव कमावलं. 

8/12

अंगदला स्वयंपाकाची आवड असून तो मोकळ्या वेळेत वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. 

9/12

त्याचा वैयक्तित आयुष्यामुळेही तो कायम चर्चेत राहिला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, लग्नापूर्वी त्याने 75 मुलींना डेट केलं होतं. 

10/12

एवढंच नाही तर त्या मुली कायम त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.  काही मुली तर 10 वर्षे मोठ्या होत्या. त्याने बालपणीची मैत्रीण आणि त्यापेक्षा तीन वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न केलं. 

11/12

लग्नापूर्वी बायको अभिनेत्री नेहा धुपिया प्रेग्नेंट असल्याने त्यांनी 2018 मध्ये घाईने लग्न केलं. या दोघांना आज एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

12/12

अभिनेता अंगद बेदीने नुकताच दुबई झालेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटाकवलंय. हे पदक त्यांने आपल्या वडिलांना समर्पित केलंय.