'मी RCB मध्ये होतो तेव्हा...'; विराटची कामगिरी, फिटनेसबद्दल कुंबळेचं विधान

Anil Kumble Take On Virat Kohli: 22 मार्चपासून आयपीएलचं पर्व सुरु होत आहे.  पहिला सामाना एम. ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये अनिल कुंबळेने विराटबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकेकाळी विराट आणि कुंबळेमधील कथित वाद चांगलाच गाजला होता. आता तोच कुंबळे विराटबद्दल काय म्हणतोय पाहा...

| Mar 13, 2024, 16:16 PM IST
1/8

Anil Kumble Take On Virat Kohli

भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराटमधील सातत्य वाखाणण्याजोगं असल्याचं कुंबळेनं म्हटलं आहे.

2/8

Anil Kumble Take On Virat Kohli

एका टी-20 संघामध्ये जो जोश लागतो तो विराटमध्ये नेहमीच दिसून येतो आणि तो ही ऊर्जा इतरांपर्यंत पोहचवतो असं कुंबळेनं म्हटलं आहे.  

3/8

Anil Kumble Take On Virat Kohli

विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे जो एकाच संघाकडून तब्बल 16 पर्वांमध्ये खेळला आहे. विराट सुरुवातीपासूनच बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघाकडून खेळत आहे.

4/8

Anil Kumble Take On Virat Kohli

"विराटचं सातत्य कौतुकास्पद आहे. मी जेव्हा आरसीबीमध्ये होतो तेव्हा त्याला जवळून पाहिलं आहे. त्यावेळेस 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने त्याचं टी-20 करिअर सुरु केलं होतं," अशी आठवण कुंबळेने सांगितली.

5/8

Anil Kumble Take On Virat Kohli

विराटने भविष्याचा विचार करुन आपल्या फिटनेसवर काम केल्याचं कुंबळेने सांगितलं. "त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याने त्याला भविष्यात कसं क्रिकेट खेळायचं आहे यानुसार आपल्या शरीराला आकार दिला आणि फिटनेसवर काम केलं. त्याने व्हाइट बॉल क्रिकेटमध्येही अमुलाग्र बदल केला," असं कुंबळेने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

6/8

Anil Kumble Take On Virat Kohli

"कसोटी क्रिकेटमधील विराटच्या विक्रमी कामगिरीची आपल्याला कल्पना आहेच," असं म्हणत विराटचं कसोटीमधील योगदानही भरीव असल्याचा शेरा कुंबळेनं दिलं.  

7/8

Anil Kumble Take On Virat Kohli

"भारतासाठी टी-20 खेळताना विराटचं सातत्य आणि त्याने ते जितक्या काळ राखलं ते सारं कौतुकास्पद आहे," असंही कुंबळे म्हणाला.  

8/8

Anil Kumble Take On Virat Kohli

"विराट ज्यापद्धतीचा आक्रमकपणा आणि सामन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मैदानातील कृतीमधून दाखवतो त्यामुळे संघाला फायदा होतो," असं कुंबळे म्हणाला.