Ashadhi Ekadashi: कर्नाटकातील शितोळे अंकलीतून माऊलींच्या अश्वांचे आळंदीच्या दिशेने प्रस्थान

Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi: आषाढी एकादशीनिमित्त पंढपूर, आळंदीमध्ये दाखल होणाऱ्या पालख्या प्रस्थान करत असतानाच महाराष्ट्राच्या शेजरील कर्नाटकमधील बेळगावमधून शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून दरवर्षी आळंदीतील सोहळ्यासाठी दाखल होणाऱ्या अश्वांनी आळंदीच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.

May 31, 2023, 15:34 PM IST
1/6

Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील माऊलींच्या मानाच्या अश्वांनी आज (31 मे 2023 रोजी) श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केलं. श्रीमंत शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून हे अश्व रवाना झाले.

2/6

Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून झाले.

3/6

Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi

यावेळी श्रीमंत सरदार उर्जितसिंह शितोळे सरकार,  महादजीराजे  शितोळे सरकार , युवराज विहानराजे शितोळे सरकार, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफळकर,  अजित परकाळे, निवृत्ती चव्हाण. माऊली गुळुजकर,  विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

4/6

Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi

आज म्हणजेच 31 मे रोजी या पालखीचा मुक्काम मिरजमध्ये असेल. दुसऱ्या दिवशी मिरज ते सांगली अंतर कापून मुक्काम सांगलवाडीतील राम मंदिरमध्ये केला जाईल. तिसरा मुक्कम इस्लामपूर, चौथा वाहगाव, पाचवा मुक्काम भरतगावात केला जाईल.

5/6

Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi

5 जून रोजी पालखी भुईंजला मुक्कामी असेल. त्यानंतर सारोळा, शिंदेवाडी आणि पुण्यात दोन दिवस मुक्काम करुन वारी 10 जून रोजी आळंदीत पोहचणार आहे.

6/6

Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi

शितोळे अंकली ते श्री क्षेत्र आळंदीपर्यंतच्या या पालखी सोहळ्याचं सविस्तर वेळापत्रकही जारी करण्यात आलं आहे.