Birthday Special : बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत दिग्दर्शक! 5000 रुपये हातात घेत गाठली मुंबई; आज 850 कोटींचा मालक

Entertainment : हा चिमुकला आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आहे. अजय देवगण आणि संजय दत्तपेक्षाही त्याचाकडे संपत्ती जास्त आहे. गोरखपूरचा हा मुलगा मुंबईत येऊन बॉलिवूडवर वर्चस्व गाजतोय. 

Sep 10, 2024, 09:52 AM IST
1/11

फोटोमध्ये दिसणार हा चिमुकला आहे अनुराग कश्यप...उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये 10 सप्टेंबर 1972 मध्ये त्याचा जन्म झाला. आज तो त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुरागचे वडील प्रकाश सिंह हे उत्तर प्रदेश राज्य विद्युत निर्मिती निगम लिमिटेडचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता होते. अनुराग कश्यपने सुरुवातीचे शिक्षण डेहराडूनच्या ग्रीन स्कूल आणि ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये झालं. त्यानंतर दिल्लीतील विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये घेतलं. 

2/11

अनुराग 1993 मध्ये निव्वळ 5000 रुपये घेऊन मुंबईमध्ये आपलं नशिब आजमवण्यासाठी आला. मुंबई सारख्या शहरात होते नव्हते तेही पैसे संपले. त्यामुळे कधी समुद्रकिनारी तर कधी रस्त्याच्या कडेला झोपून त्याला दिवस काढावे लागले. पृथ्वी थिएटर्समध्ये काम मिळवण्याचा खूप प्रयत्न करत दिवस काढणं सुरु होते. त्याला एक नाटक मिळालं पण तेही अपूर्ण राहिलं. नाटकाचा दिग्दर्शकाचा मृत्यू झाला.   

3/11

आज अनुराग कश्यप बॉलिवूडच्या उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक असून त्याने आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि वेब सीरिज बनवल्या आहेत. बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासोबतच त्याने भरपूर पैसाही कमावला आहे. संपत्तीच्या बाबतीत तो संजय दत्त आणि अजय देवगणसारख्या सुपरस्टारपेक्षाही पुढे आहे. 

4/11

फक्त दिग्दर्शक म्हणून तो बॉलिवूडमध्ये काम नाही करत तर तो एक अभिनेताही आहे. त्यामुळे अभिनयाची जादू चाहत्यांना वेड लावतो.

5/11

दिग्दर्शक आणि निर्माता असण्यासोबतच अनुराग कश्यप लेखकही आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या आहेत. चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक मालिकेतही काम केलंय.

6/11

अनुराग कश्यपला खरी ओळख 'सत्या' चित्रपटातून झाली. 1998 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा होते आणि त्याची कथा अनुरागने लिहिलं होती.

7/11

'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून अनुराग कश्यपला हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी आणि विशेष ओळख प्राप्त झाली. 2012 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट अनुरागने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

8/11

गँग्स ऑफ वासेपूरने अनुरागला रातोरात स्टार बनवलं. अनुरागच्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये 'सेक्रेड गेम्स', 'लस्ट स्टोरी', 'बॉम्बे वेल्वेट', 'देव डी', 'ब्लॅक फ्रायडे' आणि 'नो स्मोकिंग' इत्यादींचा समावेश आहे.

9/11

भरपूर प्रसिद्धीसोबतच अनुरागने भरपूर संपत्तीही कमावली आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, अनुरागची एकूण संपत्ती 850 कोटी रुपये आहे. तो संजय दत्त आणि अजय देवगणपेक्षाही श्रीमंत आहे.

10/11

'द फायनान्शियल एक्स्प्रेस'च्या रिपोर्टनुसार, अजय देवगणची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार संजय दत्तची एकूण संपत्ती 295 कोटी रुपये आहे. दोन्ही कलाकारांची मिळून एकूण संपत्ती अनुराग कश्यपपेक्षा कमीच आहे.

11/11

अनुराग यांचं वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर 1997 मध्ये त्यांचं पहिलं लग्न फिल्म एडिटर आरती बजाज सोबत झालं होतं. पण 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याने अभिनेत्री कल्की कोचलिनशी लग्न केलं, हे लग्नही देखील टिकलं नाही. पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अनुरागला त्याची पहिली पत्नी आरतीपासून एक मुलगी असून तिचं नाव आलिया कश्यप आहे.