पहिलं लग्न तुटलं; 7 वर्ष लहान अभिनेत्यासोबतच लग्न चार वर्ष लपवलं, आज 'ही' अभिनेत्री हसण्यासाठी घेते लाखो रुपये

Entertainment News : एकेकाळी अमिताभ बच्चनची अभिनेत्री बनणणार होती ही चिमुकली...पण आज ही अभिनेत्री हसण्यासाठी घेते लाखो रुपये...

Sep 26, 2023, 09:41 AM IST

Happy Birthday Archna Puran Singh : बॉलिवूडमधील स्टार्सचे फोटो अनेकदा डिजिटल जगात व्हायरल होतो. पण आज आम्ही ज्या चिमुकलीचा फोटो आणला आहे तिचा आज वाढदिवस आहे.

1/10

या चिमुकलीने टीव्हीपासून बॉलिवूडम इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ही अभिनेत्री हसण्यासाठी लाखो रुपये घेते. अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते. 

2/10

आम्ही बोलतोय द कपिल शर्मा शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांच्याबद्दल...

3/10

अर्चना पूरण सिंहने 1987 मध्ये जलवा या चित्रपटातून सिनेसृष्टीच्या दुनियेत पाऊल ठेवलं. या चित्रपटात ती नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत दिसली होती. यांनतर मोहब्बतें ते बोल बच्चन यांसारख्या चित्रपटांचा तिच्या अभिनय प्रतिभाने चाहत्यांची मनं जिंकली.   

4/10

मिस ब्रिगेंजाने आतापर्यंत 100 चित्रपटात काम केलं आहे. कॉमेडी सर्कस या पहिल्या रिअॅलिटी शोमध्ये ती जज झाली. त्यानंतर द कपिल शर्मा शो मध्ये तिने नवज्योत सिंग सिद्धीची जागी घेतली. 

5/10

अर्चना 1993 मध्ये टीव्ही शो 'वाह क्या सीन है' मध्ये दिसली होती. मग 'श्रीमान श्रीमती'मध्येही मुख्य भूमिकेत तिने सर्वांची मनं जिंकली. 

6/10

तिचं वैयक्तित आयुष्याचीही खूप चर्चा झाली. तिचं पहिलं लग्न तुटलं आणि प्रेमावरील तिचा विश्वास उडाला.   

7/10

त्यानंतर तिच्या आयुष्यात अभिनेता परमीत सेठीची एन्ट्री झाली. ती त्याच्यापेक्षा सात वर्ष मोठी होती.  दोघांमध्ये पहिले मैत्री झाली मग प्रेम. ते दोघेही चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी 1992 मध्ये लग्न केलं. या दोघांनी आपलं नातं चार वर्ष सगळ्यांपासून लपवलं होतं.   

8/10

या लग्नामागेही एक किस्सा आहे. अभिनेत्री सांगितलं की, ते दोघ एका रात्री 11 वाजता भेटले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ते लग्न करण्यासाठी घराबाहेर पडले. रात्री 12 वाजता त्यांना एक पंडित भेटले. त्या पंडितने विचारलं तुम्ही पळून जाऊन लग्न करत आहात का? लग्न असं होतं नाही मुहूर्त काढावा लागेल. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताचा मुहूर्त काढला आणि असं आमचं लग्न झालं.

9/10

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जुम्मा चुम्मा यावर किमी काटकर ऐवजी अमिताभ बच्चनसोबत अर्चना दिसणार होती. हे गाणं खरं तर अग्निपथसाठी तयार करण्यात आलं होतं. पण शेवटच्या क्षणी लक्षात आलं की हे गाणं अग्निपथमधील अमिताभच्या पात्राला बसत नाही आहे. नंतर हे गाणं हममध्ये चित्रित करण्यात आलं. 

10/10

अर्चनाची गणना आज अति श्रीमंत स्टार्समध्ये केली जाते. द कपिल शर्मा शोमध्ये हसण्यासाठी अर्चना मोठी रक्कम घेते. तिची फीस जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ती प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रुपये घेते. एका रिपोर्ट्सनुसार द कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सीझनसाठी तिने एकूण 8 कोटी रुपये घेतले होते. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार अर्चनाची एकूण संपत्ती ही 254 कोटी रुपयांची आहे.