30 सप्टेंबरआधी उरकून घ्या 'ही' 4 कामं नाहीतर खातं फ्रिज होईल, हजारोंचा फटका बसेल अन्...

Things To Do Before September 30th: सप्टेंबर महिना या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी संपत आहे. 30 दिवसांचा हा महिना संपण्याआधी तुम्ही 4 महत्त्वाची कामं नसतील केली तर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. ही 4 कामं नेमकी कोणती आणि ती का 30 सप्टेंबरआधी केली पाहिजेत हे जाणून घेऊयात...

| Sep 26, 2023, 09:06 AM IST
1/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

सप्टेंबर महिना संपण्यासाठी केवळ 4 दिवस बाकी आहेत. या 4 दिवसांमध्ये काही महत्त्वाची कामं तुम्ही केली नसतील तर ती वेळीच करुन घ्या नाहीतर तुमच्या अडचणी वाढू शकतात. आज आपण अशाच काही कामांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची डेडलाइन ही 30 सप्टेंबर आहे. 

2/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

चला तर मग जाणून घेऊयात अशा 4 कामांबद्दल जी तुम्ही 30 सप्टेंबर 2023 आधी केली नाहीत तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ही कामं पूर्ण करुन घेतली पाहिजेत. याच चार आवर्जून करायच्या कामांची यादी पाहूयात...

3/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्यूअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आणि तुमचं डीमॅट खातं असेल तर 30 सप्टेंबरअच्या आधी तुम्ही एक महत्त्वाचं काम उरकलं पाहिजे. हे काम म्हणजे या खात्यासाठी नॉमिनी म्हणजेच वारसदार नेमणे. तुम्ही जर वारसदार निवडला नाही तर खातं फ्रिज होऊ शकतं.

4/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

डीमॅट खातं फ्रिज झालं तर शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करता येणार नाही किंवा म्यूच्यूअल फंडामध्ये गुंतवणूकही करता येत नाही. सेबीने आपल्या डीमॅट खातेदारांना वारसदारांचं नाव नोंदवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे.

5/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

ऑक्टोबरपासून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करण्याआधी वारस जाहीर केला नाही तर खातं गोठल्यास शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येणार नाही.

6/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

तुम्ही स्मॉल सेव्हिंग्स स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल तर 30 सप्टेंबर तुमच्यासाठीही महत्त्वाची आहे. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, स्मॉल सेव्हिंग्स स्कीममध्ये सबस्क्राइब करणाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्डची कॉपी जमा करण्याचे निर्देस दिले आहेत.

7/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

ज्या खातेदारांनी PPF, SSY, NSC, SCSS किंवा इतर कोणत्याही स्मॉल सेव्हिंग्स स्कीमअंतर्गत खातं सुरु केलं असेल आणि त्याच्याशी आपला आधार क्रमांक जोडला नसेल तर ते कामही 30 सप्टेंबरआधी करुन घ्यावं.

8/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 'वी केअर स्कीम'मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता केवळ 4 दिवसांचा कालावधी बाकी आहे. कारण ही स्कीम 30 सप्टेंबर 2023 रोजी बंद होणार आहे. या स्कीममध्ये उत्तम परतावा दिला जात आहे.  

9/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

ज्येष्ठ नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 'वी केअर स्कीम'मध्ये सामान्यपेक्षा अधिक व्याजदर दिला जात आहे. त्यामुळे याअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर 30 तारखेआधीच म्हणजेच 30 सप्टेंबर 2023 आधीच करावी लागले. नंतर या योजनेअंतर्गत गुंतवणूक करता येणार नाही.

10/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

जर तुमच्याकडे आजही 2000 रुपयांची नोट असेल तर 30 सप्टेंबर 2023 आधी ती बँकेत जमा करावी. नाहीतर या नोटेची काहीच किंमत राहणार नाही.  

11/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये 2 हजारांची नोट चलनामधून बाहेर केली जाईल असं जाहीर केलं होतं. 

12/12

4 financial tasks to be wrapped up before 2023 September 30 deadline

केंद्रीय बँकेने लोकांना 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ची डेडलाइन दिलेली आहे. या तारखेआधी 2 हजारांच्या नोटा बँकेत जमा करुन त्या इतर चलनी नोटांमध्ये बदलून घेता येणार आहेत.