तु कुठची IAS अधिकारी आहेस का? या टोमण्यानंतर MBBS सोडून महिला झाली...

IAS Priyanka Shukla Success Story: IAS प्रियंका शुक्ला यांनी 2006 मध्ये किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज, लखनऊमधून एमबीबीएस पूर्ण केले होती की त्यांनी लगेच ठरवले की IAS अधिकारी व्हायचे आहे. त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती की प्रियांका यांनी IAS अधिकारी व्हायला हवे. त्यांच्या वडिलांनी तर एकदा म्हटले होते की प्रियांका यांच्या नावाच्या पुढे कलेक्टर असं लिहिलेली नेमप्लेट त्यांच्या घराबाहेर असावी. मात्र, प्रियांका यांनी डॉक्टर होण्याचा ठरवलं होतं. 

Dec 18, 2022, 13:22 PM IST
1/6

IAS Priyanka Shukla Success Story

एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी लखनऊमध्येच प्रॅक्टिस सुरू केली. नेहमी गरजूंकडे लक्ष देत, त्यांनी जवळच्या झोपडपट्ट्या आणि गावांना नियमित भेट दिली आणि रहिवाशांना त्यांचे आरोग्यावर कसे लक्ष द्यावे याचा सल्ला दिला.  

2/6

IAS Priyanka Shukla Success Story

प्रियांका एका झोपडपट्टीत तपासणीसाठी गेली असता, त्यांना एक महिला घाणेरडं पाणी पिताना आणि मुलांना ते पाणी देताना दिसली. त्या महिलेनं त्या ठिकाणाहून घेतलेलं पाणी पिऊ नये असा आग्रह प्रियांका यांनी केला. मात्र, त्या महिलेनं प्रियांका यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. उलट प्रियांका यांना उत्तर देत ती महिला म्हणाली की 'तू काय कुठची कलेक्टर आहेस का? '

3/6

IAS Priyanka Shukla Success Story

त्या एका वाक्यानं प्रियांका यांचा फार वाईट वाटलं आणि त्यांनी ठरवलं की जर खरोखर समजात काही बदल घडवून आणायचा असेल आणि त्या महिलेनं विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असेल तर आयएएस अधिकारी होणं गरजेच आहे.   

4/6

IAS Priyanka Shukla Success Story

एकदा अयशस्वी झाल्यानंतरही, प्रियांका यांनी हार मानली नाही आणि परिक्षेची तयारी सुरु ठेवली आणि शेवटी 2009 मध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांना छत्तीसहड जिल्ह्यात एक कॅडर नेमण्यात आले.

5/6

IAS Priyanka Shukla Success Story

सध्या त्या छत्तीसगड सरकारच्या नागरी प्रशासन आणि विकास संचालक या अतिरिक्त जबाबदारीसह आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष सचिव म्हणून नियुक्त आहेत. या पोस्टिंगपूर्वी त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव होत्या.

6/6

IAS Priyanka Shukla Success Story

त्या आधी छत्तीसगडच्या जशपूर या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या. तिथल्या मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी कधीच क्लर्कच्या करिअरच्या पलीकडे करिअरचा मार्ग शोधला नाही, पण प्रियांका यांनी त्यांच्या अधिकाराचा उपयोग करून त्यांना मोठी स्वप्ने पाहायला मदत केली.