'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील शंतनूची बायको 28 वर्षींनी करणार कमबॅक?

Ashi hi Banwa Banwi: 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट आपण सगळ्यांनीच अनेकदा पाहिला असेलच. त्या चित्रपटातील धनंजय मानेच्या भावाची म्हणजे शंतनू मानेची भुमिका करणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ रेचे पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. 

Feb 19, 2023, 21:51 PM IST

Ashi hi Banwa Banwi: शंतनू माने आणि धनंजय माने यांची जोडी ही 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटामुळे लोकप्रिय ठरली आहे त्यामुळे शंतनू मानेची भुमिका साकरलेला अभिनेता सिद्धार्थ रे (Siddharth Ray) याचीही आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नीही खूप सुंदर आणि आकर्षक आहे. 

1/5

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील शंतनूची बायको 28 वर्षींनी करणार कमबॅक?

shantanu mane wife

1988 साली प्रदर्शित झालेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला पस्तीसहून अधिक वर्षे झाली आहे तरी या चित्रपटाची लोकप्रियता आजही गेलेली नाही. अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सिद्धार्थ रे या अभिनेत्यानंही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या चित्रपटातून त्यानं शंतनू माने म्हणजेच अशोक सराफ यांच्या धाकट्या भावाची भुमिका केली होती.   

2/5

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील शंतनूची बायको 28 वर्षींनी करणार कमबॅक?

shantanu mane

सिद्धार्थने 1977 मध्ये आलेल्या ‘चानी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले.1980 च्या ‘थोडीशी बेवफाई’ ह्या चित्रपटातून त्यानं पदार्पण केले होते. सिद्धार्थचं 2004 मध्ये अवघ्या 41 व्या वर्षी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. परंतु आज सिद्धार्थ या जगात नसले तरी त्यांची पत्नी मात्र अभिनेत्री म्हणून कार्यरत होती आता तब्बल 28 वर्षांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. त्यांना दोन मुलंही आहेत. 

3/5

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील शंतनूची बायको 28 वर्षींनी करणार कमबॅक?

siddharth ray

1999 मध्ये त्यानं लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला होता. शांतिप्रिया हिने अनेक तामिळ आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारचा 'सौगंध' या चित्रपटातही तिनं कामं केले आहे. साऊथ चित्रपटातील अभिनेत्री भानूप्रिया हीची ती बहीण आहे. 

4/5

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील शंतनूची बायको 28 वर्षींनी करणार कमबॅक?

ashi hi banwa banwi

मध्यंतरी अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता शांतीप्रिया पुन्हा एकदा कमबॅक करते आहे. 'भारत कोकिला' या सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर बायोपिक चित्रपट बनणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. 

5/5

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील शंतनूची बायको 28 वर्षींनी करणार कमबॅक?

shantipriya

शांतीप्रिया ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे.